Indian Former PM Manmohan Singh Death : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम अर्थतज्ज्ञ अशी मनमोहन सिंग यांची ख्याती होती. देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झालेले ते पहिले शीख पंतप्रधान होते. २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम केलं. मनमोहन सिंग यांच्या डोक्यावर कायम निळी पगडी असे. यामागे एक खास कारण होतं. त्यांनी स्वतः ते कारण सांगितलं होतं.

२००६ मध्ये मनमोहन सिंग यांना डॉक्टरेट ऑफ लॉ ही पदवी देण्यात आली

२००६ या वर्षी मनमोहन सिंग यांना केम्ब्रिज युनिव्हर्सिटीत (Cambridge University) ‘डॉक्टरेट ऑफ लॉ’ ही पदवी देण्यात आली. यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांनी आपण निळी पगडी का घालतो, याविषयी मनमोहन सिंग यांनी सांगितलं होतं. ही आठवण आजही लोकांच्या स्मरणात आहे. गुरुवारी मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याच रुग्णालयात त्यांची प्रकृती आणखी बिघडली आणि गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

pralhad iyengar mit suspended
एमआयटीने निबंधावरून भारतीय विद्यार्थ्याला केले निलंबित; नेमकं प्रकरण काय? कोण आहे प्रल्हाद अय्यंगार?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Chennamaneni Ramesh BRS MLA
Chennamaneni Ramesh: भारतीय नागरिकत्व रद्द झालेले देशातील पहिले आमदार; कोण आहेत चेन्नमनेनी रमेश?
Pusad Naik family, Indranil Naik , Vasantrao Naik,
अजित पवारांसोबत गेलेल्या नाईक घराण्याला मंत्रिपदाची भेट ?
anoushka kale cambridge
ऐतिहासिक केंब्रिज युनियनच्या अध्यक्षपदी भारतीय विद्यार्थिनीची निवड; कोण आहेत अनुष्का काळे?
Mohan Babu files police complaint against son Manchu Manoj
ज्येष्ठ अभिनेत्याने मुलगा अन् सूनेविरोधात दिली तक्रार; मुलानेही वडिलांवर केले आरोप
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
Shailendra kumar bandhe Success Story
Success Story: शिपायाची नोकरी ते अधिकारी, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याचा प्रेरणादायी प्रवास

हे पण वाचा- मनमोहन सिंग यांना सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली; रितेश देशमुख, दिशा पटानीची पोस्ट

मनमोहन सिंग निळी पगडी का घालत असत त्यांनी स्वतःच सांगितलं होतं कारण

डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले होते की, जेव्हा ते ‘केम्ब्रिज’मध्ये शिकत होते तेव्हा ते निळी पगडी घालायचे. यावरून त्यांच्या मित्रांनी त्यांचे नाव ‘ब्ल्यू टर्बन’ असे ठेवले होते. डॉ. मनमोहन सिंग सांगतात की, निळ्या रंगाची पगडी घालण्यामागे कोणतेही विशिष्ट कारण नाही. त्यांना निळा रंग खूप आवडतो म्हणून ते निळ्या रंगाची पगडी घालतात. एवढ्या वर्षांनंतर आजही मनमोहन सिंग निळीच पगडी घालायचे. त्यांची ही आठवण कायम स्मरणात राहिल यात शंकाच नाही. वयाच्या नव्वदीत असताना मनमोहन सिंग हे व्हील चेअरवर राज्यसभेच्या कामकाजाला उपस्थित राहिले होते. त्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.

मनमोहन सिंग यांची व्यावसायिक आणि राजकीय कारकीर्द

१९५७ ते १९५९ या कालावधीत अर्थशास्त्राचे वरिष्ठ व्याख्याता म्हणून काम केले.
१९६३ ते १९६५ या काळात प्राध्यापक होते.
१९६६ मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक होते.
१९६६ ते १९६९ पर्यंत UNCTD सोबत काम केले.
१९६९ ते १९७१ पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापारात प्राध्यापक म्हणून काम केले.
मनमोहन सिंग यांची ललित नारायण मिश्रा यांनी परराष्ट्र व्यापार मंत्रालयाचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.
१९६९ मध्ये मनमोहन सिंग दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक होते.
१९७२ मध्ये अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार बनले.
१९७६ मध्ये अर्थ मंत्रालयात सचिव होते
१९७६ मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक होते.
१९७६ ते १९८० या कालावधीत मनमोहन सिंह भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक होते.
१९८२ ते १९८५ या तीन वर्षांच्या कालावधीत मनमोहन सिंह यांनी RBI चे गव्हर्नर म्हणून काम केलं.
१९८५-१९८७ या कालावधीत मनमोहन सिंह यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले.
१९८७ ते १९९० या कालावधीत मनमोहन सिंह दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून कार्यरत होते.
१९९१ मध्ये केंद्रीय लोक आयोगाचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष बनले.
२००४ ते २०१४ या कालावधीत ते भारताचे पंतप्रधान होते.

मनमोहन सिंग यांनी १९६४ मध्ये ‘इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ – सस्टेन्ड ग्रोथ’ नावाचं पुस्तक लिहिलं. त्यांनी अनेक लेखही लिहिले जे अर्थशास्त्राच्या जर्नल्सच्या श्रेणीत प्रकाशित झाले.

Story img Loader