Manmohan Singh Sister : प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार मनमोहन सिंग यांचे गुरुवारी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. आज मनमोहन सिंग यांचे पार्थिव त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आणले असून, उद्या अंत्यदर्शनासाठी ते काँग्रेस मुख्यालयात नेण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी ९.३० त्यांच्या पार्थिवाच्या अंतयात्रेल काँग्रेस मुख्यालयातून सुरुवात होणार आहे. दरम्यान कोलकाता येथे वास्तव्यास असलेल्या मनमोहन सिंग यांच्या भगिणी गोविंद कौर यांना आजारपणामुळे त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी दिल्लीला जाता येणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबाबत बोलताना त्यांचे भाचे गुरदीप सिंग म्हणाले, “ते आधी अर्थमंत्री आणि नंतर देशाचे पंतप्रधान होते. पण त्याचवेळी ते आमच्या कुटुंबाचे सदस्यही होते. कुटुंबातील सर्व सदस्यांशी त्यांचे जवळचे नाते होते. ते आमच्यासाठी नेहमीच उपलब्ध असत. जेव्हा जेव्हा कुटुंबीयांना मार्गदर्शनाची गरज पडायची तेव्हा तेव्हा ते आमच्याशी अगदी लहान गोष्टींबाबतही चर्चा करायचे. आम्हाला ही बातमी रात्री कळाली. पण आम्ही ती आईला (मनमोहन सिंग यांची बहीण) सांगितली नव्हती. तिला आम्ही याबाबत सकाळी सांगितले. प्रकृती स्थिर नसल्याने तिला दिल्लीला नेता येणारा नाही. डॉक्टरांनी तिला प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.” माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्या बहिणीचे नाव गोविंद कौर असे असून, त्या कोलकात्याला वास्तव्यास असतात.

हे ही वाचा : Dr. Manmohan Singh Death: “जे त्यांनी न बोलता करून दाखवलं, ते अनेकांना…”, राज ठाकरेंची मनमोहन सिंग यांना सोशल पोस्टमधून श्रद्धांजली!

मनमोहन सिंग यांची कारकिर्द

डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गाह गावात झाला होता. त्यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथून पदवीचे शिक्षण घेतले आणि अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवली. डॉ. मनमोहन सिंग यांनी १९७१ मध्ये भारतीय व्यापार मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. १९९१ मध्ये, भारत आर्थिक संकटाचा असताना, अर्थमंत्री म्हणून त्यांनी आर्थिक उदारीकरणाचा पाया घातला. पुढे २२ मे २००४ ते २६ मे २०१४ पर्यंत डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकार ३,६५६ दिवस सत्तेत होते.