गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास ते देशासाठी घातक ठरेल, या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यावरून भाजपमध्ये संतापाची लाट पसरली आहे. विशेष तपास यंत्रणा आणि न्यायालयाने मोदी यांना निर्दोष ठरविले असतानाही पंतप्रधानांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करून भाजपने त्याचा तीव्र निषेध केला आहे.
यूपीएमध्ये दोन सत्ताकेंद्रे आहेत, असे वक्तव्य डॉ. सिंग यांनी केले आहे त्याकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी लक्ष वेधले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपनेही सातत्याने दोन सत्ताकेंद्रांचा मुद्दा उपस्थित केल्याचे राजनाथ सिंग म्हणाले.
यूपीएला सरकार स्थापनेची तिसरी संधी मिळणार नसल्याचे पंतप्रधानांनी गृहीत धरले असून त्यामुळेच त्यांनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे वक्तव्य केले आहे, असेही भाजपचे अध्यक्ष म्हणाले. गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने मोदी यांनी देशापुढे विकासाचे एक मॉडेल ठेवले असतानाही पंतप्रधानांनी असे वक्तव्य करणे हास्यास्पद असल्याचेही ते म्हणाले.
दोन सत्ताकेंद्रे असल्याने या सरकारकडून आपण कसलीही अपेक्षा करू शकणार नाही, असे भाजप सातत्याने सांगत आला असून शुक्रवारी त्यावर पंतप्रधानांनीच शिक्कामोर्तब केले आहे. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यच हिरावले गेले आहे, असेही राजनाथ सिंग म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला २७२ पेक्षा जास्त जागा- राजनाथ सिंह
भाजप अध्यक्षांकडून पंतप्रधानांच्या मोदींबाबतच्या वक्तव्याचा निषेध
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास ते देशासाठी घातक ठरेल, या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यावरून भाजपमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
First published on: 04-01-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manmohans comment on modi laughable rajnath singh