हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या मनोहरलाल खट्टर (वय ६०) यांची निवड झाली आहे. हरयाणात भाजपचे ते पहिलेच मुख्यमंत्री असून प्रथमच जाटवगळता पंजाबी व्यक्तीला मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. रा. स्व. संघाचे प्रचारक असलेले खट्टर यांची भाजपच्या ४७ आमदारांनी चंडीगड येथील अतिथिगृहात झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष दिनेस शर्मा व संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत निवड केली. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक मानले
जातात. खट्टर हे प्रथमच आमदार बनले असून ४० वर्षे संघाचे प्रचारक आहेत. त्यांनी कर्नाल मतदारसंघातून ६३,७३६ मतांनी विजय मिळवला. भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे ते विश्वासू आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रदेशाध्यक्ष रामविलास शर्मा होते. मात्र शर्मा यांनीच खट्टर यांचे नाव सुचवले. त्याला अभिमन्यू व प्रेमलता यांनी अनुमोदन दिले. अठरा वर्षांनंतर हरयाणाला प्रथमच जाटेतर मुख्यमंत्री मिळाला आहे.
भजनलाल हे १९९१ ते १९९६ मध्ये मुख्यमंत्री होते; ते जाट नव्हते. त्यानंतर बन्सीलाल, ओमप्रकाश चौताला, भूपींदर सिंह हुड्डा हे जाट मुख्यमंत्री होते. ९० सदस्यांच्या हरयाणा विधानसभेत भाजपला ४७ जागा मिळाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा