देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मीरामार या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोहर भाई अमर रहें या घोषणा यावेळी देण्यात आल्या. एक लढवय्या नेता म्हणून मनोहर पर्रिकर प्रसिद्ध होते. मात्र कर्करोगाने त्यांना हरवले. रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज रविवारी संपली. दोनापौला येथील निवासस्थानी रविवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. पर्रिकर वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. पर्रिकर यांच्या पार्थिवावर अंत्यंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने सोमवारी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. पर्रिकर यांच्या निधनामुळे देशभरात शोकाकूल वातावरण आहे.
रविवारी ही बातमी येताच संपूर्ण देशावर शोककळा पसरली. मनोहर पर्रिकर हे त्यांच्या साधेपणासाठी आणि त्यांच्या पारदर्शी स्वभावासाठी प्रसिद्ध होते.
Live Blog

Highlights
मनोहर भाई अमर रहे अशा घोषणा देत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना अखेरचा निरोप देण्यात येतो आहे
Panaji: Visuals from the last rites ceremony of late Goa Chief Minister #ManoharParrikar. pic.twitter.com/LrdsXHmRuB
— ANI (@ANI) March 18, 2019
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अश्रू अनावर झाले.
Panaji: Union Minister Smriti Irani gets emotional as she pays last respects to Goa CM #ManoharParrikar. pic.twitter.com/NOOucOU8iO
— ANI (@ANI) March 18, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वीच मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामनही यावेळी हजर होत्या .
Panaji: Prime Minister Narendra Modi and Defence Minister Nirmala Sitharaman pay last respects to Goa CM #ManoharParrikar pic.twitter.com/aNUC7nEJPm
— ANI (@ANI) March 18, 2019
मनोहर पर्रिकर यांनी अल्पसंख्याक, आदिवासी आणि ओबीसींना सुखावणारे निर्णय घेतले. खऱ्या अर्थाने ते ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेचे जनक आहेत. वाचा सविस्तर>>
पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याला रवाना, मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आणि अंत्ययात्रेतही सामील होणार
Prime Minister Narendra Modi to leave for #Goa shortly, to offer last respects to Goa CM #ManoharParrikar who passed away yesterday. pic.twitter.com/adrMxbKmJV
— ANI (@ANI) March 18, 2019
Goa: People gather at BJP office in Panaji to pay last respects to late Goa CM #ManoharParrikar pic.twitter.com/2jQpNMG60R
— ANI (@ANI) March 18, 2019
मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पणजीतील भाजपा मुख्यालयात
Goa: Mortal remains of Goa CM #ManoharParrikar brought to BJP office in Panaji. Union Minister Nitin Gadkari arrives to pay last respects to him. pic.twitter.com/nvg5j1Of4c
— ANI (@ANI) March 18, 2019
Manohar Parrikar’s mortal remains arrive at the BJP headquarters in Panjim, Goa. FOLLOW LIVE UPDATES: https://t.co/rITXcET17w pic.twitter.com/cJIUAfb87o
— The Indian Express (@IndianExpress) March 18, 2019
मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयात दाखल झाले असून सुमारे तासभर त्यांचे पार्थिव मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे. पर्रिकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मुख्यालयात भाजपा कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून मुख्यालय परिसरात शोकाकूल वातावरण आहे.
पणजी येथील भाजपा मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
Goa: Visuals from BJP office in Panaji. Mortal remains of Goa CM #ManoharParrikar will be brought here for people to pay last respects to him. pic.twitter.com/zSHGEZqwBu
— ANI (@ANI) March 18, 2019
मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयाच्या दिशेने रवाना...
Goa: Mortal remains of Goa CM #ManoharParrikar being taken to BJP office from his residence, in Panaji. pic.twitter.com/Ksr8afYDNa
— ANI (@ANI) March 18, 2019
मनोहर पर्रिकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर गोवा उच्च न्यायालय आणि जिल्हा सत्र न्यायालयातील कामकाज सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहे.
#Goa: High Court of Bombay at Goa and District Courts in the state to remain closed today in view of passing away of Goa CM #ManoharParrikar.
— ANI (@ANI) March 18, 2019
संरक्षणमंत्री असताना पाकव्याप्त काश्मीरमध्ये लक्ष्यभेद हल्ले करण्यात आले. त्याचे श्रेय त्यांनी संघाच्या शिकवणीला दिले होते. सध्या गाजत असलेली राफेल विमान खरेदी त्यांच्या काळातच झाली होती. संरक्षणमंत्री असतानाही महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत दूर ठेवले जात असल्याने पर्रिकर खासगीत नाराजी बोलून दाखवीत असत.
Visuals from outside the residence of #ManoharParrikar in Panaji, Goa. pic.twitter.com/5M6lzmaVWv
— ANI (@ANI) March 18, 2019
अत्यंत साधे राहणीमान आणि अभ्यासू नेते म्हणून मनोहर पर्रिकर यांना ओळखले जायचे. मुख्यमंत्री आणि नंतर संरक्षणमंत्री झाल्यानंतरही त्यांचे साधे रहाणीमान कायमच राहिले. वाचा पर्रिकरांच्या साधेपणाचे किस्से>>
मनोहर पर्रिकर यांच्या पत्नी मेधा पर्रिकर यांचे निधनही कर्करोगानेच झाले होते. पत्नीच्या निधनानंतर पर्रिकर यांनी दोन्ही मुलांकडे लक्ष दिले. वाचा सविस्तर>>
आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे पर्रिकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
आपल्या राज्यावर प्रेम आणि निष्ठा असावी तर परिकारांसारखी!
— nitesh rane (@NiteshNRane) March 17, 2019
जगले फक्त गोवा साठी !
भावपूर्ण श्रद्धांजली..सर
मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव सकाळी ९. ३० ते १०. ३० या वेळेत पणजी येथील भाजपाच्या मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे. यानंतर सकाळी १०. ३० वाजता त्यांचे पार्थिव कला अकादमी येथे नेण्यात येणार आहे. कला अकादमीत सकाळी ११ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. संध्याकाळी चार वाजता कला अकादमीपासून अंत्ययात्रेला सुरुवात होईल. मिरामर येथे संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
मनोहर पर्रिकर १९९४ मध्ये पणजी मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले. जून ते नोव्हेंबर १९९९ दरम्यान ते विरोधी पक्षनेते होते. त्यांनी काँग्रेस सरकारला त्या काळात धारेवर धरले. २४ ऑक्टोबर २००० रोजी ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्या वेळी २७ फेब्रुवारी २००२ पर्यंत त्यांचे सरकार टिकले. नंतर ५ जून २००२ रोजी ते पुन्हा निवडून आले व मुख्यमंत्री बनले. २९ जानेवारी २००५ रोजी त्यांचे सरकार चार आमदारांनी राजीनामे दिल्याने अल्पमतात आले. नंतर काँग्रेसचे प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री झाले. २००७ मध्ये पर्रिकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने पराभव केला. २०१२ मध्ये लोकप्रियतेवर आरूढ होत पर्रिकर यांनी २१ जागा जिंकल्या नंतर ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. २०१४ पर्यंत त्यांची घोडदौड सुरू होती.
Highlights
मनोहर भाई अमर रहे अशा घोषणा देत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना अखेरचा निरोप देण्यात येतो आहे
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना अखेरचा निरोप देण्यात येतो आहे, काही वेळातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अश्रू अनावर झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वीच मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामनही यावेळी हजर होत्या .
मनोहर पर्रिकर यांनी अल्पसंख्याक, आदिवासी आणि ओबीसींना सुखावणारे निर्णय घेतले. खऱ्या अर्थाने ते ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेचे जनक आहेत. वाचा सविस्तर>>
मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कला अकादमीत दाखल. कला अकादमीत सर्वसामान्य नागरिकांना पर्रिकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार
मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव कला अकादमीकडे रवाना, कला अकादमीबाहेर पर्रिकर समर्थकांची गर्दी, कला अकादमीत संध्याकाळी चार वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याला रवाना, मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आणि अंत्ययात्रेतही सामील होणार
मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव निवासस्थानावरुन पणजीतील भाजपा मुख्यालयात नेण्यात आले. हे अंतर पाच किलोमीटर होते. यादरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा भाजपा समर्थकांनी गर्दी केली होती.
मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पणजीतील भाजपा मुख्यालयात
मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयात दाखल झाले असून सुमारे तासभर त्यांचे पार्थिव मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे. पर्रिकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मुख्यालयात भाजपा कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून मुख्यालय परिसरात शोकाकूल वातावरण आहे.
पणजी येथील भाजपा मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयाच्या दिशेने रवाना...
मनोहर पर्रिकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर गोवा उच्च न्यायालय आणि जिल्हा सत्र न्यायालयातील कामकाज सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहे.
संरक्षणमंत्री असताना पाकव्याप्त काश्मीरमध्ये लक्ष्यभेद हल्ले करण्यात आले. त्याचे श्रेय त्यांनी संघाच्या शिकवणीला दिले होते. सध्या गाजत असलेली राफेल विमान खरेदी त्यांच्या काळातच झाली होती. संरक्षणमंत्री असतानाही महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत दूर ठेवले जात असल्याने पर्रिकर खासगीत नाराजी बोलून दाखवीत असत.
अत्यंत साधे राहणीमान आणि अभ्यासू नेते म्हणून मनोहर पर्रिकर यांना ओळखले जायचे. मुख्यमंत्री आणि नंतर संरक्षणमंत्री झाल्यानंतरही त्यांचे साधे रहाणीमान कायमच राहिले. वाचा पर्रिकरांच्या साधेपणाचे किस्से>>
मनोहर पर्रिकर यांच्या पत्नी मेधा पर्रिकर यांचे निधनही कर्करोगानेच झाले होते. पत्नीच्या निधनानंतर पर्रिकर यांनी दोन्ही मुलांकडे लक्ष दिले. वाचा सविस्तर>>
आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे पर्रिकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
गोव्यात १९९०च्या दशकापर्यंत काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष हे दोनच मुख्य पक्ष होते. भाजपाने हळूहळू या राज्यात प्रवेश करण्यास सुरुवात केली. तेव्हापासूनच मनोहर पर्रिकर हा गोवा भाजपचा चेहरा होता.