देशातील तीनही संरक्षण दलांचे एकीकरण आवश्यक आहे आणि या तीनही सेवांचा एक प्रमुख असावा यासाठी संरक्षण दलप्रमुख असे पद निर्माण करण्यासाठी आपण पावले उचलली आहेत, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी येथे स्पष्ट केले. संरक्षण दलप्रमुखाच्या सेवेचा कालावधीही निश्चित केला जाणार आहे, असेही संरक्षणमंत्री म्हणाले.
येत्या दोन-तीन महिन्यांत आपण याबाबत काही शिफारशी करणार आहोत. तीनही संरक्षण सेवा आणि संरक्षण मंत्रालय यांच्या असलेली ‘आपण’ आणि ‘ते’ ही दरी दूर करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे, असेही पर्रिकर म्हणाले.
तीनही सेवांचे एकीकरण करून त्यांचा एक प्रमुख नियुक्त करणे आवश्यक आहे. सध्याच्या रचनेत तीनही सेवांचे एकीकरण अस्तित्वात नाही त्यामुळे योग्य यंत्रणा तयार करावयास काही कालावधी लागेल, असे पर्रिकर यांनी एका परिषदेत स्पष्ट केले.
संरक्षण दलप्रमुखाची नियुक्ती करण्यास सरकार अनुकूल आहे का आणि मेजर जनरल पदावरील व्यक्तीची संरक्षण मंत्रालयात सहसचिवपदी नियुक्ती होऊ शकते का, असे पर्रिकर यांना विचारण्यात आले होते.
जेव्हा हेलिकॉप्टरची गरज लागते तेव्हा हवाई दल आणि संरक्षण दल यांचे याबाबतचे नियम वेगवेगळे आहेत. आपण टीकेच्या दृष्टिकोनातून बोलत नाही परंतु दलांचे एकीकरण आणि एकीकरणाची गरज यामुळे पैशांची बचत होणार आहे, असे ते म्हणाले.
तीनही संरक्षण दलांचे एकीकरण करण्याचा विचार-पर्रिकर
देशातील तीनही संरक्षण दलांचे एकीकरण आवश्यक आहे आणि या तीनही सेवांचा एक प्रमुख असावा यासाठी संरक्षण दलप्रमुख असे पद निर्माण करण्यासाठी आपण पावले उचलली आहेत, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी येथे स्पष्ट केले
First published on: 14-03-2015 at 02:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manohar parrikar for integration of three forces creation of cds