जम्मू- काश्मीरमध्ये सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत अडथळे आणण्याच्या उद्देशाने दहशतवाद्यांनी अलीकडे मोठय़ा संख्येने हल्ले केलेले असले, तरी लोकांनी मोठय़ा संख्येने बाहेर पडून मतदान केल्यामुळे त्यांचे मनसुबे निष्फळ ठरले आहेत, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटले आहे. ते सध्या काश्मीर दौऱ्यावर असून दहशतवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील सुरक्षेच्या परिस्थितीची पाहणी करणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे.
त्राल येथील मतदान १ टक्क्य़ावरून ३७.८ टक्क्य़ांपर्यंत गेले आहे. लोक मतदानासाठी मोठय़ा संख्येने बाहेर पडत आहेत, असे पर्रिकर यांनी पत्रकारांना सांगितले.
काश्मीरमध्ये पाच टप्प्यांत होणाऱ्या मतदानापैकी शेवटच्या दोन टप्प्यांत १४ आणि २० डिसेंबरला मतदान होणार असून मतमोजणी २३ डिसेंबरला होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा