केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सर्वाधिक चर्चा होती ती देशाच्या आरोग्य मंत्रालयाची. डॉ. हर्ष वर्धन यांनी राजीनामा दिल्यानंतर ऐन करोनाच्या काळामध्ये कुणाच्या खांद्यावर आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाईल? याविषयी चर्चा सुरू झाली होती. या चर्चेवर लगेचच पडदा पडला असून मनसुख मांडवीय यांच्याकडे देशाच्या आरोग्य मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासोबतच नव्याने तयार करण्यात आलेल्या केंद्रीय सहकार विभागाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अमित शाह यांच्याकडे सहकार विभागाचा अतिरिक्त भार असणार आहे. त्यासोबतच इतरही महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी नव्याने शपथ ग्रहण केलेल्या मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुणाकडे कोणतं खातं…

पंतप्रधान नरेंद्र मोदी – विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय (अतिरिक्त भार)
मनसुख मांडवीय – आरोग्य मंत्री, रसायन मंत्री
अमित शाह – सहकार मंत्री (अतिरिक्त भार)
ज्योतिरादित्य सिंदिया – हवाई वाहतूक मंत्री
अनुराग ठाकूर – माहिती व प्रसारण मंत्री, युथ अफेअर्स
हरदीप पुरी – नागरी विकास, गृहनिर्माण आणि पेट्रोलियम मंत्री
नारायण राणे – मध्यम व लघु उद्योग मंत्री
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री
अश्विनी वैष्णव – रेल्वे मंत्री आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री
पियुष गोयल – उद्योगमंत्री
स्मृती इराणी – महिला व बाल कल्याण मंत्री
सरबानंद सोनोवाल – बंदर आणि जलवाहतूक मंत्री, आयुष मंत्रालय
पशुपतीकुमार पारस – अन्न प्रक्रिया मंत्री
गजेंद्रसिंह शेखावत – जलशक्ती मंत्री
पुरुषोत्तम रुपाला – मासेमारी, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री

 

आज दिवसभर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचीच चर्चा सुरू असून एकूण ४३ मंत्र्यांनी राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४ मंत्र्यांचा समावेश आहे.

राज्यमंत्री

भगवंत खुबा – अपारंपरिक उर्जा विभाग आणि खते-रसायन विभाग राज्यमंत्री
कपिल पाटील – पंचायती राज राज्यमंत्री
प्रतिमा भौमिक – सामाजिक न्याय राज्यमंत्री
सुभास सरकार – शिक्षण राज्यमंत्री
राजकुमार रंजन सिंह – परराष्ट्र विभाग आणि शिक्षण राज्यमंत्री
भारती पवार – आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री
विश्वेश्वर टुडू – आदिवासी विकास आणि जलशक्ती विभाग राज्यमंत्री
शांतनु ठाकूर – बंदर, जलवाहतूक राज्यमंत्री
मुंजपरा महेंद्र – महिला व बालकल्याण आणि आयुष विभाग राज्यमंत्री
जॉन बारला – अल्पसंख्याक राज्यमंत्री
एल. मुरुगन – मासेमारी, पशुपाल आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री, माहिती व प्रसारण राज्यमंत्री
निसिथ प्रामाणिक – गृह राज्यमंत्री, युवा आणि क्रीडा राज्यमंत्री
अनुप्रिया पटेल – उद्योग राज्यमंत्री
एस. पी. बघेल – कायदा व न्याय राज्यमंत्री
राजीव चंद्रशेखर – कौशल्य विकास, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री
शोभा करंदलजे – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
दर्शन जरदोश – टेक्स्टाईल, रेल्वे राज्यमंत्री
व्ही. मुरलीधरन – परराष्ट्र, संसदीय कार्य राज्यमंत्री
मीनाक्षी लेखी – परराष्ट्र, सांस्कृतिक राज्यमंत्री
अन्नपूर्णा देवी – शिक्षण राज्यमंत्री
अजय भट – संरक्षण, पर्यटन राज्यमंत्री
अजय कुमार – गृह राज्यमंत्री

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mansukh mandviy new health minister in pm modi cabinet expansion amit shah to hold cooperation department pmw