विधानसभेच्या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी विजय प्राप्त केला असला, तरी त्यांच्या ‘पॅन’ची  माहितीच सादर करण्यात आली नसल्याची बाब उघडकीस झाली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात अनेक उमेदवारांनी आपल्या ‘पॅन’ची माहितीच घोषित केलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजस्थानातील अनूपगड मतदारसंघातून विजयी झालेल्या भाजपच्या उमेदवार सिमला बावरी आणि मध्य प्रदेशातील पुष्पराजगड मतदारसंघातून विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार फुंदेलालसिंग मारको यांनी आपल्या ‘पॅन’ची माहितीच सादर केलेली नाही.
दिल्लीतील सीमापुरी मतदारसंघातून विजयी झालेले आम आदमी पार्टीचे उमेदवार धर्मेद्र सिंग यांनीही आपल्या ‘पॅन’चा तपशील जाहीर केलेला नाही. चार राज्यांमधील जवळपास एक हजाराहून अधिक उमेदवारांनी ‘पॅन’चा तपशील सादर केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Story img Loader