छत्तीसगढमधील मतदान झाल्यावर तेथील सुरक्षाव्यवस्था कमी करण्यात आल्यानंतर नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर निशाणा साधला. बस्तरमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे चार जवान शहीद झाले असून, तीन जण जखमी झालेत.
चेरामांगी गावामध्ये हे जवान पूर्वनियोजित कार्यक्रमात सहभागी झालेले असताना त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला चढविला. छत्तीसगढमधील विधानसभा निवडणुकीनंतर जवानांवर करण्यात आलेला हा पहिलाच मोठा हल्ला आहे.
शहीद झालेल्यांमध्ये अमिताभ मिश्रा, मदनलाल अखे, दिगंत बयान आणि दिलीपकुमार यांचा समावेश आहे. हे सर्वजण केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १६८ बटालियनमध्ये कार्यरत होते. नक्षलवाद्यांनी हल्ल्यामध्ये चेरामांगी गावाजवळ बॉम्बस्फोटही घडवून आणले. त्यानंतर सुमारे तीन मिनिटे दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maoist attack in chhattisgarh four crpf jawans killed