सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणाऱ्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांना नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली आहे.नक्षली हल्ल्यात मरण पावणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करणं बंद करा, अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील, अशा धमकीची पत्रकं पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीने प्रसिद्ध केली आहेत. या पत्रकांमध्ये आम्ही नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा निषेध करत असल्याचे म्हटले आहे. देशातील प्रसिद्ध व्यक्ती, कलाकार, खेळाडू आणि सेलिब्रिटींनी क्रांती आणि गरिबांच्या बाजून उभे राहावे, असे आवाहन आम्ही करतो. तसेच त्यांनी पोलिसांच्या अत्याचाराचा आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात आवाज उठवावा, असे नक्षलवाद्यांनी वाटलेल्या पत्रकांत म्हटले आहे.

सीआरपीएफने केला १५ नक्षलवाद्यांचा खात्मा, सुकमा हल्ल्याचा घेतला बदला

मार्च महिन्यात सुकमा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान शहीद झाले होते. गेल्या काही वर्षांमध्ये सुरक्षा दलांवर झालेल्या मोठ्या हल्ल्यांपैकी एक म्हणून या हल्ल्याची गणना झाली होती. या हल्ल्यानंतर अक्षय कुमार याने शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ९ लाख रूपये तर सायना नेहवाल हिने प्रत्येक कुटुंबाला ५० हजार याप्रमाणे  सहा लाख रूपयांची आर्थिक मदत देऊन केली होती.

 

दरम्यान, पोलिसांच्या मते नक्षलवाद्यांनी वाटलेली पत्रके सुकमा हल्ल्यापूर्वीच छापण्यात आल्याची शक्यता आहे. या पत्रकांमध्ये गोरक्षकांकडून दलित आणि मुस्लिमांवर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांवरही भाषय करण्यात आले आहे. मात्र, या पत्रकांमधून नक्षलवाद्यांनी घेतलेली भूमिका दुटप्पी आणि मानवताविरोधी असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सुरक्षा दलातील जवान गरीब कुटुंबातील असल्याने ते आमचे शत्रू नाहीत, असा दावा सुकमा हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी केला होता. मग आता नक्षलवादी जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीला विरोध का करत आहेत? हा म्हणजे शुद्ध दुटप्पीपणाचा प्रकार झाला, असे पोलिसांनी म्हटले आहे.

संतापजनक ! शहीदाच्या कुटुंबीयाला दिलेला पाच लाखांचा धनादेश बाऊन्स

Story img Loader