सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणाऱ्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांना नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली आहे.नक्षली हल्ल्यात मरण पावणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करणं बंद करा, अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील, अशा धमकीची पत्रकं पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीने प्रसिद्ध केली आहेत. या पत्रकांमध्ये आम्ही नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा निषेध करत असल्याचे म्हटले आहे. देशातील प्रसिद्ध व्यक्ती, कलाकार, खेळाडू आणि सेलिब्रिटींनी क्रांती आणि गरिबांच्या बाजून उभे राहावे, असे आवाहन आम्ही करतो. तसेच त्यांनी पोलिसांच्या अत्याचाराचा आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात आवाज उठवावा, असे नक्षलवाद्यांनी वाटलेल्या पत्रकांत म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा