पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी एका आदिवासी व्यक्तीची चिंतामचिलिका परिसरात हत्या केली. सुरक्षा दलांनी हाती घेतलेली नक्षलवादविरोधी मोहीम थांबवावी या मागणीसाठी नक्षलवाद्यांनी ‘निषेध सप्ताह’ पाळण्याचे ठरविले असून त्याला गुरुवारपासून सुरुवात झाली.
चिंतामचिलिका येथून नक्षलवाद्यांनी रमण तामराबी (४०) यांचे मंगळवारी अपहरण केले. त्यांचा मृतदेह बुधवारी नजीकच्या जंगलात सापडला, असे पोलिसांनी सांगितले.
तामराबी यांचा गळा चिरल्याचे आणि त्यांच्या शरीरावर गोळ्या झाडल्याचे आढळले. तामराबी हा पोलिसांचा खबऱ्या असल्याचा नक्षलवाद्यांना संशय होता, असे पोलिसांनी सांगितले.
सुरक्षारक्षकांनी नक्षलवादविरोधी मोहीम हाती घेतली असून त्याच्या निषेधार्थ भाकप (नक्षलवादी) या बंदी घातलेल्या संघटनेने निषेध
सप्ताह पाळण्याचा निर्णय घेतला आहे. खबरदारीचे उपाय म्हणून
संवेदनक्षम ठिकाणी आणि आंध्र
प्रदेश व छत्तीसगडच्या सीमेवर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

Story img Loader