चीनने त्यांच्या नव्या इ-पासपोर्टवरील नकाशात अरूणाचल प्रदेश व अकसाई चीन हा भाग त्यांच्या हद्दीत दाखवला आहे. भारताने लगेच त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी व्हिसा जारी करताना भारतीय नकाशात हे दोन्ही भाग भारताच्या हद्दीत दाखवले आहेत. चीन सरकारने नवीन इ- पासपोर्ट जारी केले असून त्यात वॉटरमार्कसह असलेल्या चिनी नकाशात अरूणाचल व अकसाई चीन हे दोन्ही भाग त्यांच्या हद्दीत दाखवले आहेत. त्याची दखल घेऊन काही आठवडय़ांपूर्वी भारतानेही बीजिंगमधील दूतावासामार्फत चिनी लोकांना भारताचा नकाशा असलेले व्हिसा जारी केले. त्यात हे दोन्ही भाग भारताच्या बाजूला दाखवले आहेत.
यापूर्वी चीनने जम्मू-काश्मीरमधील रहिवाशांना स्टॅपल्ड व्हिसा देऊन राजनैतिक वादंग निर्माण केले होते. काश्मीर हा वादग्रस्त प्रदेश आहे, असा आक्षेप घेऊन त्यांनी हे स्टॅपल्ड व्हिसा दिले होते. त्याचबरोबर अरूणाचल प्रदेशातील कुणालाही व्हिसा देण्याचे नाकारले होते. भारताने त्यावेळी चीनकडे तीव्र निषेध व्यक्त करून जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना नेहमीप्रमाणे व्हिसा मिळण्याची व्यवस्था केली होती.
चीनचे जुने दुखणे
चीन आतापर्यंत अकसाई चीन व अरूणाचल प्रदेश या भागावर हक्क सांगत आला आहे. १०३० कि.मी हा सीमावर्ती प्रदेश कुंपण नसलेला आहे. १९६२ मध्ये चीन व भारत यांच्यात अकसाई चीन व अरूणाचल प्रदेशवरून युद्ध झाले होते पण १९९३ व १९९६ मध्ये दोन्ही देशांनी करार करून शांतता राखण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे पालन करण्याचा करार केला होता. चीनच्या एका राजनैतिक शिष्टमंडळाने सिक्कीमला भेट देऊन राजनैतिक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे सिक्कीम हा भारताचा भाग आहे, हे चीनने मान्य केले आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंग व चीनचे पंतप्रधान वेन जियाबो यांची कंबोडियातील आसियान बैठकीच्या पाश्र्वभूमीवर बैठक झाली होती तेथे उभय नेत्यांनी भारत-चीन सीमा प्रश्नावरील चर्चेत प्रगती घडवून आणण्याचे मान्य केले होते.
चीनच्या एका राजनैतिक शिष्टमंडळाने सिक्कीमला भेट देऊन राजनैतिक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे सिक्कीम हा भारताचा भाग आहे, हे चीनने मान्य केले आहे.
भारत-चीन यांच्यात ‘नकाशा युद्ध’
चीनने त्यांच्या नव्या इ-पासपोर्टवरील नकाशात अरूणाचल प्रदेश व अकसाई चीन हा भाग त्यांच्या हद्दीत दाखवला आहे. भारताने लगेच त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी व्हिसा जारी करताना भारतीय नकाशात हे दोन्ही भाग भारताच्या हद्दीत दाखवले आहेत.
First published on: 24-11-2012 at 02:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Map war between india and china china depicting arunachal pradesh and aksai chin as its territory in maps of the country