केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यानंतर जगभरातील मराठी भाषिकांकडून सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, आता नायजेरियातील मराठी भाषिकांनीही पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. “मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी आनंद व्यक्त केला. ते त्यांच्या संस्कृती आणि मुळांशी ज्या पद्धतीने जोडले गेलेत, ते पाहणे अतिशय कौतुकास्पद आहे” असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

shambhuraj desai replied to uddhav thackera
“मुलाच्या लग्नाचा खर्च सरकारी तिजोरीतून केल्याचा” आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शंभूराज देसाईंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Pankaja Munde
Pankaja Munde : “तुमची नजर लागली अन् खासदाराऐवजी आमदार झाले”, पंकजा मुंडेंचं भरसभेत वक्तव्य; रोख कोणाकडे?
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates : अमेरिकेच्या निवडणुकीत सहा भारतीयांची एन्ट्री; श्री ठाणेदार मिशिगनमधून विजयी!
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
Ajit pawar on Yogi Adityanath
Ajit Pawar on Yogi Adityanath: योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला अजित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “बाहेरच्या नेत्यांनी…”
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”

हेही वाच – Rajnath Singh: “डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदींनी दिला”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या नायजेरिया दौऱ्यावर आहेत. ते नायजेरियात पोहोचताच तेथील मराठी भाषिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केलं. तसेच त्यांना पत्र देत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. भारत सरकारने मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. हा निर्णय मराठी भाषिकांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. या निर्णयामुळे मराठी साहित्य आणि संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल. असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, दोन दिवसांच्या नायजेरियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी रविवारी नायजेरियाचे राष्ट्र्पती महामहिम बोला अहमद तिनुबू यांची भेट घेतली. यावेळी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. महत्त्वाचे म्हणजे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर’ या नायजेरियाच्या दुसऱ्या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानाने सन्मानित करण्यात आलं.

हेही वाचा – Rahul Gandhi: कुणालाच सुट्टी नाही! निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्या राहुल गांधींच्याही बॅगा; पाहा व्हिडिओ

यासंदर्भात बोलताना, मी नायजेरिया सरकार आणि नायजेरियाच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच हा सन्मान १४० कोटी भारतीयांना आणि भारत आणि नायजेरिया यांच्यातील घनिष्ठ मैत्रीला समर्पित करतो. हा पुरस्कार आम्हाला दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यासाठी प्रेरणा देत राहील, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली.