Mark Zuckerberg : मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी बायडेन प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी हाऊस ज्युडिशिअरी कमिटीला लिहिलेल्या पत्रात आरोप केला आहे की, बायडेन-कमला हॅरिस प्रशासनाने कोविड संबंधित पोस्ट सेन्सॉर करण्यासाठी मेठावर वारंवार दबाव आणला होता. परंतु, याबाबत कधी वाच्यता न केल्याने त्यांना आता खंत वाटतेय, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हाईट हाऊससह २०२१ बायडेन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या कार्यसंघांवर विनोद आणि व्यंगांसह विशिष्ट कोविड १९ सामग्री सेन्सॉर करण्यासाठी वारंवार दबाव टाकला, असं झुकेरबर्ग यांनी पत्रात म्हटलं आहे. आम्ही सहमत नसताना त्यांनी आमच्या समूहाबद्दल खूप निराशा व्यक्त केली होती. शेवटी आम्ही या दबावाला बळी पडून कोविड १९ संबंधित बदल केले, असंही ते म्हणाले.

झुकेरबर्गने पुढे म्हटलंय की, मला विश्वास आहे की सरकारी दबाव चुकीचा होता आणि मला खेद वाटतो की आम्ही त्याबद्दल जास्त बोललो नाही. मला ठामपणे वाटतं की कोणत्याही प्रशासनाकडून कोणत्याही दिशेने दबाव आल्याने आम्ही आमच्या सामग्री मानकांशी तडजोड करू नये.”

हेही वाचा >> Assam Tension: बांगलादेशींना आसाम सोडण्यासाठी आठवड्याची मुदत; शिवसागर जिल्ह्यात तणाव

पत्रात नेमकं काय म्हटलंय?

“अमेरिका सरकार मेटासारख्या कंपन्यांशी कशी संवाद साधते याबद्दल सध्या बरीच चर्चा आहे आणि मला आमची भूमिका स्पष्ट करायची आहे. आमचे प्लॅटफॉर्म प्रत्येकासाठी आहेत. आम्ही लोकांना सुरक्षित मार्गाने कनेक्ट होण्यास मदत करतो. याचा भाग म्हणून आम्ही नियमितपणे जगभरातील सरकारांकडून आणि इतरांकडून त्यांच्या तक्रारी आणि निवेदनही ऐकतो.”

“२०२१ मध्ये व्हाईट हाऊससह बायडेन प्रशासनाताली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विनोद आणि व्यंगांसह विशिष्ट कोविड १९ सामग्री (Content) सेन्सॉर करण्यासाठी आमच्या कार्यसंघांवर वारंवार दबाव टाकला आणि आम्ही सहमत नसताना आमच्या कार्यसंघांबद्दल खूप निराशा व्यक्त केली. शेवटी तो कंटेन्ट काढायचा की नाही हा आमचा निर्णय होता. माझा विश्वास आहे की सरकारी दबाव चुकीचा होता आणि मला खेद वाटतो की आम्ही त्याबद्दल अधिक स्पष्टपणे बोललो नाही.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mark zuckerberg did mistake in listenign to biden administration on coronavirus sgk