पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरात मुस्लिमांविरोधात वाढत चाललेला असंतोष आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत मुस्लिमांना प्रवेशबंदीची केलेली मागणी, या सर्व गोष्टींना फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने विरोध दर्शवला आहे. झकरबर्गने आपल्या फेसबुक अकाऊंटवर मुस्लिमांच्या समर्थनार्थ एक पोस्ट अपलोड केली आहे.
मार्क म्हणतो, मी जगभरातील आणि फेसबुकवर असलेल्या सर्व मुस्लिम नागरिकांचे समर्थन करतो. पॅरिस हल्ला व या आठवड्यात व्यक्त झालेल्या द्वेषाच्या भावनेनंतर इतरांच्या कृत्यांमुळे मुस्लिमांना रोष व तिरस्कार सहन करावा लागत असून, त्यांना किती भीती वाटत असेल याची मी केवळ कल्पनाच करू शकतो. एक ज्यू म्हणून माझ्या आई-वडिलांनी मला इतर कोणत्याही धर्माच्या लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात उभं राहायला शिकवलं आहे.
फेसबुकचा प्रमुख या नात्याने मी मुस्लिम नागरिकांना सांगू इच्छितो, की या मंचावर आपले कायम स्वागतच असेल. मी तुमच्या हक्कांसाठी नेहमी लढा देईन आणि तुमच्यासाठी सुरक्षित व शांतीचं वातावरण तयार व्हावं यासाठी प्रयत्न करेन. आपण आशा सोडता कामा नये, एकत्र राहून एकमेकांतील चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या तर आपण नक्कीच चांगलं जग निर्माण करू शकतो.
जगभरातील मुस्लिमांना झकरबर्गचा पाठिंबा
माझ्या आई-वडिलांनी मला इतर कोणत्याही धर्माच्या लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात उभं राहायला शिकवलं
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-12-2015 at 11:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mark zuckerberg statement in support of american muslims