फेसबुकचा सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याचे ट्विटर आणि पिंट्रेस्ट अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. ‘अवरमाईन टीम’ने या हॅकिंगची जबाबदारी स्वीकारली आहे. या दोन्ही सोशल मीडिया व्यासपीठांवरील लाखो खाती धोकादायक स्थितीत असल्याचे दाखवून देण्यासाठीच झुकेरबर्गचे अकाऊंट हॅक करण्यात आल्याचे या टीमने म्हटले आहे.
अकाऊंट हॅक केल्यावर झुकेरबर्गच्या ट्विटर पेजवर पुढील संदेश लिहिण्यात आला. “Hey @finkd, you were in Linkedin Database with the password ‘dadada’!” पिंट्रेस्टच्या अकाऊंटवर “Hacked by OurMine Team.” असा संदेश लिहिण्यात आला आहे. अवरमाईन टीमने झुकेरबर्गचे इन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. पण झुकेरबर्गचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आलेले नाही. ट्विटर अकाऊंट हॅक केल्यानंतर लगेचच ट्विटरच्या व्यवस्थापनाकडून हे अकाऊंटच स्थगित करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा