Marriage Fraud : मॅट्रिमोनिअल साइट्सवरून संपर्क साधून महिलांची फसवणूक करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. एवढंच नाही तर अशा प्रकारच्या साइट्सवरून आर्थिक फसवणूक झाल्याचे अनेक प्रकारही पाहायला मिळतात. आता असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये घडला आहे. मेट्रिमोनियल साईटवरून एका व्यक्तीने तब्बल १६ तरुणींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

नेमकं घटना काय?

आयआयएम बेंगळुरूमधून शिक्षण घेतलेल्या एका पदवीधर तरुणाने मॅट्रिमोनिअल साइट्सवरून ओळख करत १६ महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक केली. २०२१ मध्ये या ३९ वर्षीय व्यक्तीने आपली नोकरी गमावलेली होती. हा व्यक्ती ग्रेटर नोएडामधील बिसरख येथील राधा स्काय गार्डन सोसायटीमध्ये वास्तव्यास होता. राहुल चतुर्वेदी असं या व्यक्तीचं नाव आहे. या राहुल चतुर्वेदीने मॅट्रिमोनिअल साइट्सवर बनावट प्रोफाइल तयार केलं होतं. तसेच अशा प्रकारची बनावट प्रोफाइल तयार करून १६ पेक्षा जास्त महिलांसह ८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
WhatsApp Wedding Invitation Scam Scammers Are Using New Tricks To Steal Your Money
व्हॉट्सअ‍ॅपवर आलेली लग्नपत्रिका डाऊनलोड करताय? मग सावधान, अन्यथा तुमचा मोबाईल हॅक झालाच म्हणून समजा
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
actor amit tandon cheated wife ruby tandon
पत्नीची अनेकदा फसवणूक केली, अभिनेत्याचा स्वतःच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल खुलासा; घटस्फोट घेतल्यावर सहा वर्षांनी पुन्हा तिच्याशीच केलं लग्न

हेही वाचा : Tirupati Laddu Row : तिरुपती येथील लाडूच्या वादानंतर आता जगन्नाथ पुरी मंदिराने घेतला मोठा निर्णय, ‘या’ घटकाची होणार तपासणी

सेंट्रल नोएडाचे डीसीपी शक्ती मोहन अवस्थी यांनी या प्रकरणासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, “चतुर्वेदी याने आयआयएम बेंगळुरू येथे शिक्षण घेतलेलं आहे. त्याआधी मध्य प्रदेशातील एका खासगी विद्यापीठातून बीकॉम पूर्ण केलं. २०१२ ते २०१७ पर्यंत चतुर्वेदीने गुडगावमधील टेलिकॉम कंपनीत एचआर मॅनेजर म्हणून काम केलं. त्यानंतर २०१८ ते २०२१ पर्यंत त्याने बेंगळुरूमध्ये दुसऱ्या एका एमएनसी कंपनीबरोबर काम केलं. २०२२ मध्ये तो नोएडा येथे आला आणि एका भागिदाराबरोबर त्याने कापड व्यवसाय सुरु केला. याच काळात ग्रेटर नोएडातील एका ४० वर्षीय महिलेने ७ सप्टेंबर रोजी बिसरख पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला.”

फिर्यादीने म्हटलं की, “ती एका मॅट्रिमोनिअल साइट्सवरून आरोपीला भेटली. त्यानंतर आमचं संभाषण सुरु झालं. त्यानंतर तो तिच्या घरी जाऊन पालकांनाही भेटला. तेव्हा आपल्या आजारी वडिलांच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे, असे सांगून त्याने वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे तिची तब्बल २.४ लाखांची फसवणूक केली. त्यानंतर जेव्हा तिने तिचे पैसे परत मागितले त्यावेळी आरोपीने टाळाटाळ केली. त्यानंतर आरोपीने तिच्याशी संपर्क बंद केला आणि धमकी दिली, असं फिर्यादीने म्हटलं आहे.

दरम्यान, राहुल चतुर्वेदीने मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर बनावट प्रोफाईल तयार करून प्रीमियम मेंबरशिप घेतल्याचे तपासात उघड झालं. तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत एचआर मॅनेजर म्हणून काम करत असल्याचं भासवत संशय टाळण्यासाठी तो फोन कॉल दरम्यान त्याचा आवाज मॉड्युलेट करायचा. एवढंच नाही तर विश्वास बसण्यासाठी त्याने पगाराच्या बनावट स्लिप्स देखील बनवल्या होत्या. आता चतुर्वेदीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पुढील तपास सुरु आहे.

IIM चं स्पष्टीकरण

सध्या येणाऱ्या काही बातम्यांमध्ये राहुल चतुर्वेदी याने IIMB चा माजी विद्यार्थी असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र अशी कुठलीही व्यक्ती आमची माजी विद्यार्थी नाही. फसवणुकीच्या आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र IIM चा आणि राहुल चतुर्वेदीचा काही संबंध नाही. आमच्याकडे अशी कुठलीही नोंद नाही. उलट राहुल चतुर्वेदी हा IIMB चा माजी विद्यार्थी आहे असं सांगणाऱ्यांबाबतच आम्हाला चिंता आहे. कारण अशा नावाची कुठलाही विद्यार्थी आमचा माजी विद्यार्थी नाही असं स्पष्टीकरण आयआयएमने दिलं आहे.