नासाच्या मार्स क्युरिऑसिटी रोव्हर या गाडीने स्वत:चे छायाचित्र म्हणजे सेल्फी काढले असून त्यात ही गाडी मंगळावरच्या मोजावे या ठिकाणी दिसत आहे.
त्या ठिकाणी या यंत्रमानवरूपी गाडीने खणले असून माउंट शार्पमधील हा भाग आहे. पारम्प हिल्सचे दृश्यही त्यात आहे. तेथे ही गाडी पाच महिने काम करीत होती. ही गाडी एक टन वजनाची आहे. मार्स हँड लेन्स इमेजरने घेतलेल्या छायाचित्रातून हे सेल्फी दृश्य जुळवण्यात आल्याचे नासाने म्हटले आहे. मंगळावरील गेल विवरात शार्प पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या खडकांचा जो भाग आहे तो पारम्प म्हणून ओळखला जातो. गेल्या जानेवारीत क्युरिऑसिटी गाडीने मोजावे २ या ठिकाणी खणले होते. तेथून काही नमुनेही घेतले होते.
मंगळावरील रोव्हर गाडीने सेल्फी टिपले
नासाच्या मार्स क्युरिऑसिटी रोव्हर या गाडीने स्वत:चे छायाचित्र म्हणजे सेल्फी काढले असून त्यात ही गाडी मंगळावरच्या मोजावे या ठिकाणी दिसत आहे.
First published on: 27-02-2015 at 02:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mars rovers new selfie