IPL 2024 Retation: उत्तर प्रदेशमधला एक व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरून सध्या सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावरून केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर परखड शब्दांत टीका करत आहेत. ‘या प्रकारामुळे भाजपाची असंवेदनशीलता समोर आली असून हा सगळा तमाशा बंद करा’ अशा शब्दांत ठाकरे गटाकडून या प्रकारावरून हल्लाबोल करण्यात आला आहे. कॅप्टन शुभम गुप्ता काश्मिरी खोऱ्यात दहशतवाद्यांशी लढा देताना शहीद झाले. त्यांच्या घरी काढलेल्या या व्हिडीओमध्ये सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

शहीद कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या घरी त्यांच्या मातोश्री आक्रोश करत असताना हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. यात भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेश मंत्रीमंडळातील मंत्री योगेंद्र उपाध्यय व इतर काही पदाधिकारी शहीद शुभम गुप्ता यांच्या मातोश्रींना ५० लाखांचा चेक घेण्याची आणि फोटो काढण्याची विनंती करताना दिसत आहेत. या व्हिडीओवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून ठाकरे गटानं सामना अग्रलेखातून भाजपाला लक्ष्य केलं आहे.

Rohit Pawar angry on Fadnavis Govt as after 35 days Santosh Deshmukh killers not punished Brother Dhananjay protesting
“न्याय देणारी व्यवस्था आरोपीला वाचवण्यासाठी…”, धनंजय देशमुखांच्या आंदोलनानंतर रोहित पवारांचा सरकारवर संताप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Maharashtra News Updates : “पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारवर संताप
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Maharashtra News : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करत आक्रोश मोर्चा, मनोज जरांगेही सहभागी
Sarangi Mahajan Serious Allegations on Dhananjay and Pankaja Munde
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप, “धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन हडप केली, वाल्मिक कराड…”
sanjay gaikwad mutton liquor
Video : “मतदारांना फक्त दारू मटण पाहिजे; ते विकले…”, संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य, व्हायरल व्हिडीओने खळबळ
Chandrashekhar Bawankule Answer to Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे अतिविलासी, मातोश्री २ च्या…”, मोदींवर टीका केल्यानंतर भाजपाचं उत्तर

“भारतीय जुगार पार्टी”

भाजपाचा उल्लेख भारतीय जुगार पार्टी करताना ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर टीकास्र सोडलं आहे. “महाराष्ट्रात ‘भाजप’ म्हणजे भारतीय जुगार पार्टी झाली आहे, तर उत्तर प्रदेशात ‘बीजेपी’मधील ‘बी’ म्हणजे बेशरम आणि ‘पी’ म्हणजे पब्लिसिटी अर्थात स्वस्त प्रसिद्धी असे समीकरण बनले आहे. शुभम गुप्ता यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय प्रचंड आक्रोश करत असताना उत्तर प्रदेशच्या हिंदुत्ववादी सरकारचे एक मंत्री योगेंद्र उपाध्याय हे ५० लाखांचा चेक घेऊन फोटोग्राफर, कॅमेरामनसह गुप्ता यांच्या आग्रा येथील घरी पोहोचले. तेव्हा कॅ. शुभम यांची आई म्हणजे वीरमाता जवळ जवळ शुद्ध हरपून आक्रोश करीत होती. घरामध्ये आकांत, दुःखाचा उद्रेक सुरू असताना मंत्रीमहाशय कॅमेरा, फोटोग्राफरसमोर वीरमातेच्या हाती ५० लाखांचा चेक कोंबत होते व पह्टोग्राफरला प्लॅश मारण्यास सांगत होते”, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

“ती वीरमाता बेशुद्धीच्या अवस्थेतही संतापली, ‘मंत्रीजी, ही नौटंकी आणि प्रदर्शन बंद करा. मला नको तुमचे पैसे. पैसे परत घेऊन जा आणि माझ्या मुलास परत आणा.’ या आक्रोशानंतरही हिंदुत्ववादी सरकारचे मंत्री ‘फोटो’शूट करत राहिले यास काय म्हणावे?” असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.

“पुलवामानंतरही असाच बेशरमपणा”

“पुलवामा हत्याकांडानंतरही भाजपने असाच बेशरमपणा केला होता. पुलवामा शहिदांचे फोटो आणि अस्थिकलश फिरवून मते मागण्याचा जाहीर कार्यक्रम तेव्हाही झाला. तेव्हा चाळीस जवान होते, आता चार आहेत इतकेच, पण भूमी तीच आहे, जेथे रोज आपले जवान शहीद होत आहेत”, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

संविधान बदलण्याच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, “कुणाचाही बाप…”…

“अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर भारताने विश्वचषकाची लढाई हरली, पण भारत विश्वचषक जिंकला असता तर पंतप्रधान मोदी हातात विश्वचषक उंचावून कप्तान रोहित शर्मासह संपूर्ण स्टेडियमला उघडय़ा जीपमधून फेरफटका मारणार होते. गुजरातसह संपूर्ण देशभरात भारतीय जनता पक्ष विश्वचषक जिंकण्याचे श्रेय मोदींनाच देणार होता व त्या प्रसिद्धीची जोरदार तयारी आधीच झाली होती. राजस्थान वगैरे राज्यांत तर या विजयाचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी होणार होता, पण आपण पराभूत झालो व उत्सवाचे सगळेच राजकीय मुसळ केरात गेले”, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

Story img Loader