पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक ए इन्साफ या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या सुटकेविरोधात सत्तारुढ पक्षाने आंदोलन सुरु केलं आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायलयासमोर आंदोलन करण्यात येतं आहे. पाकिस्तान डेमोक्रेट मुव्हमेंटच्या पुढाकाराने हे आंदोलन केलं जातं आहे. यामध्ये सत्तारुढ पक्षाचेही नेते सहभागी आहेत. याच आंदोलनात सहभागी असलेल्या मरियम नवाझ यांनी इम्रान खान यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
मरियम नवाझ यांनी सुप्रीम कोर्टासमोर असलेल्या लोकांना संबोधित करताना असं म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, “आज या इमारतीच्या बाहेर मोठ्या संख्येने लोक आले आहेत. मी त्यांना सांगू इच्छिते की जे इम्रान खान यांनी जे कृत्य केली आहे ती तर दहशतवादीही करत नाहीत. आज उमर बंदियाल यांना विचारु इच्छिते की पाकिस्तानची जनता तुमच्याकडे उत्तर मागायला आली आहे. तुम्ही त्यांना काय उत्तर देणार? उमर बंदियाल यांनी पाकिस्तानात न्यायिक मार्शल कायदा थोपवला” असाही आरोप मरियम नवाझ यांनी केला.
पाकिस्तानमध्ये पाचवा मार्शल लॉ, न्यायिक मार्शल लॉ हा लादला जातो आहे. आम्ही न्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेचा आदर करतो आहोत. आज त्या वकिलांबाबत आणि न्यायाधीशांबाबत मी बोलणार नाही जे संविधानाचं पालन करतात.
मरियम नवाझ आणखी काय म्हणाल्या?
इम्रान खान यांनी जे कृत्य केलं आहे तसं कृत्य दहशतवादी किंवा पाकिस्तानचे शत्रूही करु शकत नाहीत. त्यांनी त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून जनतेची लूट केली. त्यानंतर त्याच पैशांतून जमिनी विकत घेतल्या. इम्रान खान यांनी जिना हाऊस आपल्या हस्तकांद्वारे आग लावली. आता कोर्टातून जामीन मिळाल्यावर त्यांचेच लोक त्यांच्या सुटकेचा जल्लोष करत आहेत. आज पाकिस्तानात जे अराजक माजलं आहे त्यासाठी उमर बंदियाल जबाबदार आहेत. उमर बंदियाल यांनी राजीनामा दिला पाहिजे अशीही मागणी मरियम नवाझ यांनी केली.
राजा रियाझ खान यांचीही टीका
सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांना भरचौकात फाशी द्यायला हवी होती, पण न्यायालयाने त्यांचं जावयासारखं स्वागत केलं. इम्रान खान यांच्यासारख्या ज्यू एजंटवर न्यायाधीश इतके खूश असतील तर त्यांनी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफमध्ये प्रवेश घ्यायला हवा. त्या पक्षात काही जागा रिक्तही आहेत. त्यांनी (न्यायाधीशांनी) भविष्यात पीटीआयच्या तिकिटावर निवडणूक लढवावी. तसेच विद्यमान न्यायाधीशांच्या जागी असे न्यायाधीश आणले पाहिजेत, जे गरिबांना न्याय देऊ शकतील,