तुरुंगातून सुटका झालेला फुटीरतावादी नेता मसरत आलमने बुधवारी श्रीनगरमध्ये पाकिस्तानी ध्वज फडकावून भारतविरोधी घोषणा दिल्यामुळे त्याला पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जम्मू-काश्मीरमधील पीडीपीच्या नेतृत्त्वाखालील सरकारला मसरत आलमला अटक करण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसकडूनही आलमच्या अटकेसाठी जम्मू-काश्मीर सरकारवर दबाव टाकण्यात येतो आहे.
आलमला भारतविरोधाची मोठी पार्श्वभूमी आहे. १९९०च्या दशकात तो हिज्बुलचा दहशतवादी म्हणून कार्यरत होता. त्याला १९९१ साली पकडून तुरुंगात डांबले होते. अमरनाथ यात्रेवरून २००८ साली झालेल्या दंगलीत त्याने भारतविरोधी रगडा हे नृत्य निदर्शकांमध्ये रुजवले होते. राज्यात भारतविरोधी भित्तीचित्रे काढणे, मशिदींमध्ये भारतविरोधी प्रचार करणाऱ्या सीडी वाटणे असे त्याचे उपद्व्याप सुरू असतात. त्याची ७ मार्चला कैदेतून सुटका झाली होती. त्यानंतर त्याने आपल्या कारवाया नव्याने सुरू केल्या आहेत.

Story img Loader