आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात रविवारी दोन प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर ४० हून अधिक लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, विशाखापट्टणमहून रायगडकडे जाणाऱ्या प्रवासी रेल्वेची पलासा एक्स्प्रेसला समोरासमोर धडक झाली. या धडकेमुळे विशाखापट्टणमहून-रायगडकडे जाणाऱ्या रल्वेचे तीन डबे रुळावरून घसरले. या रेल्वे अपघातात नेमके किती प्रवासी जखमी झाले, याची अधिकृत माहिती अद्याप समजली नाही. दोन रेल्वेंची समोरासमोर धडक झाल्याने यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघातस्थळी बचावकार्य केलं जात आहे, याबाबतची माहिती एका रेल्वे अधिकाऱ्याने दिली.

या अपघातानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी तातडीने मदत आणि उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी विशाखापट्टणम आणि विजयनगरमच्या जवळच्या जिल्ह्यांमधून शक्य तितक्या रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात येत आहेत. तसेच जखमींना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून दिली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive accident in andhra pradesh two trains collided 3 dead 40 injured rmm