Tamil Nadu hospital Fire Six Killed : तामिळनाडूमधील एका खाजगी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत एका अल्पवयीन मुलासह किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना तामिळनाडूतील डिंडीगुल जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा घडली.
या दुर्घटनेनंतर हे सर्व सहा जण हे इमारतीच्या लीफ्ट मध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडल्याची माहिती पोलीस आणि अग्निशमन विभागाने दिली आहे. यानंतर तात्काळ त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र येथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. अग्निशमन विभागाकडून रुग्णालयात शोध आणि बचाव कार्य सुरू असताना या पीडितांचा लीफ्टमध्ये श्वास गुदमरल्यानं मृत्यू झाला होता.
बचाव पथकाकडून किमान ३० रूग्ण आणि डॉक्टरांना इमारतीमधून बाहेर काढण्यात आले. रुग्णालयातून बाहेर काढण्यात आलेल्या सर्वांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
हेही वाचा>> शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…..
रुग्णालयात लागलेली आहे ही इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता पोलीसांनी प्राथमिक तपासानंतर दिली आहे.
दरम्यान या आगीच्या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून यामध्ये रुग्णालयाच्या इमारतीतून आग आणि धूर निघताना दिसत असून यावेळी घटनास्थळी अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या दिसत आहेत.