पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका केमिकल फॅक्टरीमध्ये भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तांगरा परिसरामध्ये ही फॅक्टरी आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुदैवाने अद्याप कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. तसंच या आगीमध्ये आर्थिक नुकसान किती झालं याचीही अद्याप माहिती मिळालेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तांगरा परिसरातील केमिकल फॅक्टरीमध्ये भीषण आग लागली. काही वेळातच आग संपूर्ण फॅक्टरीत झपाट्याने पसरली. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या अशून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

 

Story img Loader