आतापर्यंच क्रिकेटभोवती घोंगावत असलेले मॅचफिक्सिंगचे वादळ आता टेनिसपर्यंत जाऊन पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘बीबीसी’ आणि ‘बझफिडन्यूज’ या दोन्ही माध्यमसंस्थांनी त्यांच्याकडील पुराव्यांचे आधारे हे टेनिसमध्येही मॅचफिक्सिंग झाल्याचे दावे केले आहेत. या खेळावर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘टेनिस इंटेग्रिटी युनिट’ या विभागाने अग्रमानांकित ५० टेनिसपटूंपैकी १६ जणांवर मॅचफिक्सिंगचे आरोप केले आहेत. मात्र, यामध्ये प्रत्यक्षात आर्थिक व्यवहार झाले की नाहीत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आजपासूनच या मोसमातील पहिल्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेला अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला सुरुवात होते आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या आरोपांमुळे टेनिसबद्दलही क्रीडारसिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
ज्या १६ टेनिसपटूंवर हे आरोप झाले आहेत. त्यापैकी काही जणांनी ग्रॅंडस्लॅम किताबही पटकवलेला आहे. विशेष म्हणजे यापैकी कोणावरही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसून, हे सर्वजण सध्याही टेनिस स्पर्धांमध्ये खेळत आहेत. त्यापैकी ८ जण तर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतही भाग घेत आहेत. यासंदर्भात ‘बीबीसी’ आणि ‘बझफिडन्यूज’ने म्हटले आहे की, ज्या टेनिसपटूंवर हे आरोप लावण्यात आलेले आहेत. त्यांच्या फोनची, बॅंक खात्यांची आणि संगणकाची माहिती हाती आल्याशिवाय त्यांनी मॅचफिक्सिंगमध्ये सहभाग घेतला होता की नाही, हे स्पष्ट होणार नाही. त्यामुळेच आम्ही कोणत्याही खेळाडूची नावे जाहीर केलेली नाहीत.
‘टेनिस इंटेग्रिटी युनिट’चे संचालक निगेल विलर्टन म्हणाले, ‘टेनिस इंटेग्रिटी युनिट’कडून मिळालेल्या सर्व माहितीचे तज्ज्ञांकडून विश्लेषण करण्यात येते आहे. कायदेतज्ज्ञांचाही यामध्ये समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा