आगामी काळात उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींबाबत, बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी एक मोठी घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुका बसपा स्वबळावरच लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच, मागील काही दिवसांपासून या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपा व एमआयएम यांच्या आघाडी होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या, त्यावर देखील मायावतींनी भूमिका स्पष्ट केली आहे. बसपा व एमआयएम यांच्यातील आघाडीबाबतच्या चर्चा संपूर्णपणे चुकीच्या आहेत, यामध्ये काहीच तथ्य नाही. असं मायावतींनी सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बसपा प्रमुख मायावतींनी यासंदर्भात ट्विटद्वारे माहिती दिली आहे, ”माध्यामातील एक वृत्तवाहिनीकडून कालपासून अशी बातमी दाखवली जात आहे की, उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभेची निवडणूक ओवेसींचा पक्ष एमआयएम व बसपा एकत्र मिळून लढणार आहेत. हे वृत्त पूर्णपणे चुकीचे, अफवा पसरवणारे, तथ्यहीन आहे. यामध्ये काडीमात्रही सत्य नाही. बसपा या वृत्ताचे खंडण करते.”

तसेच, ”या संदर्भात पार्टीकडून पुन्हा असं स्पष्ट केलं जातं की, पंजाब सोडून उत्तरप्रदेश व उत्तराखंड मधील पुढील वर्षी सुरू होणाऱ्या विधानसभेची निवडणूक बीएसपी कोणत्याही पक्षाशी आघाडी करून लढणार नाही. म्हणजे, स्वबळावरच निवडणूक लढवणार.”

उत्तर प्रदेशात राजकीय उलथापालथ!; ‘बसपा’च्या ९ बंडखोर आमदारांनी घेतली अखिलेश यादव यांची भेट

यासंदर्भात संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर बसपाने, आता राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभा खासदार सतीशचंद्र मिश्र यांना बीएसपी सेलचे राष्ट्रीय समन्वयक बनवले आहे.

पंजाबमध्ये अकाली दलसोबत आघाडी केल्यानंतर बसपा प्रमुख मायावतींनी केलं विशेष ट्विट, म्हणाल्या…

पंजाबमध्ये २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होत असून, अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीने एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

“पंजाबमध्ये आज शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीची आघाडी, ही एक नवी राजकीय व सामाजिक सुरूवात आहे. जे की नक्कीच इथं राज्यात जनतेचा बहुप्रतीक्षित विकास, प्रगती व आनंदाच्या नव्या युगाची सुरूवात करेल. या ऐतिहासिक पावलासाठी लोकांचे हार्दिक अभिनिंदन व शुभेच्छा.” असं मायावती म्हणालेल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayawati announcement uttar pradesh uttarakhand assembly bsp will fight on its own msr