रिअल इस्टेट फर्म लॉजिक्स इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केलेल्या नोएडा अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील तब्बल २६१ फ्लॅट बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या भावाला आणि भावाच्या पत्नीला डिस्काऊंटमध्ये वाटप करण्यात आले आहेत. फसवणूक आणि अधोमूल्यांकन (डिस्काऊंट) देऊन हे फ्लॅट विकण्यात आले असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात काही नोंदी तपासल्या आहेत. त्यामध्ये १२ वर्षांहून अधिक काळ म्हणजेच कंपनीच्या स्थापनेपासून दिवाळखोरीच्या कार्यवाहीपर्यंत आणि त्यानंतरच्या मे २०२३ च्या फॉरेन्सिक ऑडिटपर्यंतच्या घटनांच्या क्रमांचा इंडियन एक्स्प्रेसने अभ्यास केला आहे.
द इंडियन एक्सप्रेसने कोणत्या नोंदी तपासल्या?
मे २०१०: लॉगिक्स इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जन्माला आली. त्यावेळी मायावती मुख्यमंत्री होत्या. मायावती २००७ पासून मुख्यमंत्री होत्या.
जुलै २०१०: दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत लॉजिक्सने मायावती यांचा भाऊ आनंद कुमार आणि भावाची पत्नी विचितेर लता यांच्यासोबत ब्लॉसम ग्रीन्स या नोएडा प्रकल्पातील सुमारे २ लाख चौरस फूट जागा विकण्यासाठी करार केला. या करारानुसार आनंद कुमार यांची एकूण खरेदी किंमत ४६.०२ कोटी रुपये आणि विचितेर लतासाठी ४६.९३ कोटी रुपये होती.
सप्टेंबर २०१०: या करारांच्या तीन महिन्यांच्या आत यूपी सरकारच्या अंतर्गत नोएडा प्राधिकरणाने ब्लॉसम ग्रीन्समध्ये २२ टॉवर विकसित करण्यासाठी लॉजिक्स इन्फ्राटेकला १,००,११२.१९ चौरस मीटर म्हणजेच २४.७४ एकर जागा भाड्याने दिली.
सप्टेंबर २०१० ते २०२२-२३: या वर्षांमध्ये, Logix ने Blossom Greens मध्ये एकूण २५३८ निवासी युनिट्सपैकी २३२९ युनिट्स विकल्या. आतापर्यंत, कंपनीने ९४४ फ्लॅट्ससह आठ टॉवर्सचा ताबा देऊ केला आहे. त्यापैकी ८४८ खरेदीदारांनी ताबा घेतला आहे. उर्वरित १४ टॉवर्सचे सिव्हिल स्ट्रक्चर पूर्ण झाले असले तरी अद्याप टॉवर्स पूर्णपणे तयार नाहीत.
४ एप्रिल २०१६ : आनंद कुमार यांनी अनुक्रमे २८.२४ कोटी आणि २८.१९ कोटी रुपये अॅडव्हान्स भरल्यानंतर त्यांना १३५ अपार्टमेंट आणि विचितेर लता यांना उर्वरित १२६ अपार्टमेंटचे वाटप करण्यात आले.
१५ फेब्रुवारी २०२०: Logix Infratech ला बांधकाम कंपनी अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स (इंडिया) लिमिटेड कडून ७.७२ कोटी रुपयांच्या थकबाकीची मागणी करणारी पहिली नोटीस प्राप्त झाली. या कंपनीने २५९.८० कोटी रुपयांच्या ब्लॉसम ग्रीन्ससाठी सिव्हिल आणि स्ट्रक्चरल कामे केली होती.
ऑक्टोबर २०२०: Logix ने NCR मधील बांधकामावर बंदी आणि अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्सची थकबाकी भरण्यास असमर्थता दर्शवत कुशल कामगारांची अनुपलब्धता असल्याचं कारण दिलं.
२९ सप्टेंबर २०२२: NCLT ने Logix विरुद्ध दिवाळखोरी कारवाईचे आदेश दिले.
दिवाळखोरीच्या नियमांनुसार, NCLT ने एक अंतरिम रिझोल्यूशन प्रोफेशनल नेमला ज्याने Logix च्या अकाऊंट्सचे ऑडिट करण्याचे आदेश दिले. मे २०२३ मध्ये IRP कडे सादर केलेल्या आणि The Indian Express द्वारे पुनरावलोकन केलेल्या या व्यवहार लेखापरीक्षण अहवालाच्या नव्या मसुद्यानुसार आनंद कुमार आणि विचितेर लता या दोघांना विकल्या गेलेल्या युनिट्सचे अवमूल्यांकन आणि व्यवहार फसवे होते.
आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये आनंद कुमार यांना प्रति चौरस फूट रु. २३०० या दराने बिल देण्यात आली होती. यावेळी हीच युनिट्स इतर गृहखरेदीदारांना प्रति चौरस ४.३५०.८५ रुपये या दराने विकल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, दिवाळखोरी कायदा २०१६ च्या कलम ४५ अंतर्गत व्यवहारांचे मूल्य कमी केले गेले आहे, असे ऑडिट अहवालात नमूद केले आहे. तसेच, त्यांना वाटप केलेल्या तब्बल ३६ युनिट्स आधीच इतरांना विकण्यात आल्या होत्या, त्यामुळे वाटपप्रक्रियेत फसवणूक झाल्याचेही यातून स्पष्ट होत असल्याचं ऑडिटमध्ये नमूद आहे.
ऑडिट अहवालात म्हटले आहे की, “आनंद कुमार यांची २८.२४ कोटींची देयके दाखवणारे व्हाउचर गुंतवणूक म्हणून न दाखवता ग्राहकांकडून आगाऊ (Advanced) या शीर्षकाखाली दाखवण्यात आली आहेत. आनंद कुमार यांच्या पत्नी विचितेर लता यांच्यावरही अनियमिततेचे जवळपास असेच आरोप करण्यात आले होते. कमी किंमतीतून १२५ पैकी २४ युनिट्स इतरांना वाटप केले जात आहेत आणि याचे व्यवहार २८.८५ कोटी Logix द्वारे संबंधित पक्षांना कोणतेही स्पष्टीकरण न देता हस्तांतरित केले जात आहे, असेही ऑडिट अहवालात म्हटले आहे.