जगभरातील संगणकांचे विषाणूंपासून रक्षण करणाऱ्या ‘मॅकॅफे’ कंपनीचा संचालक जॉन मेकॅफे हा सध्या खुनाच्या आरोपावरून होणारी अटक टाळण्यासाठी फरार झाला आहे. जॉर्जी फॉल या अमेरिकी नागरिकाच्या हत्येचा मॅकॅफे याच्यावर ठपका ठेवण्यात आला असून या प्रकरणी त्याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी मॅकॅफे मेन्शनवर रविवारी रात्री धाड टाकली. मात्र पोलिसांच्या आगमनापूर्वीच तो तिथून पसार झाला होता, अशी माहिती असंघटित गुन्हे विभागाचे प्रमुख मार्को विडाल यांनी दिली.
फॉल यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी मॅकेफे आम्हाला हवा होता, मात्र आमचे पथक तिथे येण्यापूर्वीच तो फरार झाला, असे विडाल यांनी सांगितले. फ्लोरिडाचे रहिवासी असलेले फॉल रविवारी सकाळी मृत आढळले होते. पोलिसांनी घटनास्थळी ९ मिलिमीटर लांबीचा दोरखंड जप्त केला असून या दोरखंडाने फॉल यांचा गळा आवळून खून केल्याचा संशय आहे. फॉल यांचा लॅपटॉप व मोबाईल सध्या गायब असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  मॅकेफे याला यापूर्वीही स्पटेंबर महिन्यामध्ये शस्त्र तसेच अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी स्थानिक राजकारण्यांना निधी देण्यास नकार दिल्यामुळे आपल्याला ‘लक्ष्य’ करण्यात आल्याचा दावा मॅकॅफे यांनी केला होता. मॅकेफे आणि फॉल यांच्यात काही दिवसांपूर्वीच जोरदार मतभेद निर्माण झाले होते, अशी माहिती तेथील स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा