दिल्ली महापालिका निवडणुकांचे ( एमसीडी ) निकाल आज ( ७ डिसेंबर ) जाहीर होणार आहे. त्यात आपल्या विधानांमुळे चर्चेत असणारे योगगुरू बाबा रामदेव यांनी भाजपाला सुचक सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष ( आप ) मोठा खेळ करू शकते. त्यामुळे ‘आप’ला हलक्यात घेऊ नका. ‘आप’ भाजपाची डोकेदुखी बनू शकते. त्यासाठी भाजपावाल्यांनी आता पूर्ण ताकदीने योग करायला ( मैदानात उतरायला हवे ) हवा, असे बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.

‘इंडिया टीव्ही’ने आयोजित केलेल्या योग कार्यक्रमात राजकीय परिस्थितीवर बाबा रामदेव भाष्य करत होते. “केजरीवाल पंजाबसारखा मोठा खेळ एमसीडी निवडणुकीत करण्याची शक्यता आहे. ते हारून सुद्धा जिंकू शकतात. त्यांना हलक्यात घेऊ नका,” असे बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : काँग्रेस विरुद्ध काँग्रेस: “मी सुद्धा एक माणूस आहे, मलाही…”; CM गेहलोत यांच्या ‘गद्दार’ टीकेवरुन सचिन पायलट यांचं भावनिक विधान

“केजरीवाल पहिल्यांदा काँग्रेसला संपवून नंतर भाजपाची डोकेदुखी बनेल. त्यामुळे भाजपाने जोमात हातपाय हालवून योग करण्याची गरज आहे. भाजपाने स्थानिक पातळीवर आपले कार्यकर्ते मजबूत केले पाहिजेत. काँग्रेस तशीही संकटात आहे. जिथे समस्या आहे, तिथे काँग्रेस आणि भाजपाने आपले मजबूत नेतृत्व उभे केलं पाहिजे,” असं बाबा रामदेव यांनी सांगितलं.

Story img Loader