mcd301‘मॅकडोनल्डस’च्या बर्गरमध्ये झुरळ आढळून आल्याचा आरोप न्युझीलंडमधील एका तरुणीकडून करण्यात आला आहे. अॅना सोफिया स्टिव्हनसन असे या तरुणीचे नाव असून ती मेकअप आर्टिस्टचे काम करते. स्टिव्हनसने ‘फेअरफॉक्स न्युझीलंड’ला दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री घरी परतल्यावर जेव्हा बर्गर खायला सुरुवात केली, तेव्हा तिला बर्गरमध्ये झुरळ आढळून आले. बर्गर खाताना झुरळ दाताखाली आले असता तिला तो मासातील नाजूक हडाचा तुकडा वाटल्याने तिने तो चावून बघितल्याचे तिने सांगितले. स्टिव्हनसनने रेस्तराँविरुद्ध तक्रार न नोंदविता त्या बर्गरचे छायाचित्र फेसबुकवर प्रसिद्ध केले.
साऊथ आयलंड रेस्तरॉंमधून घेतलेल्या बर्गरमध्ये सदर तरुणीला झुरळ आढळून आल्याचे आपल्याला समजले असल्याची माहिती फास्ट फूड जायंट ‘मॅकडोनल्डस’ने सोमवारी दिली. सोशल मीडियावरील संबंधीत पोस्टबाबत समजताच ब्लेनहेम शहरातील ‘मॅकडोनल्डस’च्या शाखेने तातडीने स्टिव्हनसनशी संपर्क साधल्याचे ‘मॅकडोनल्डस’कडून सांगण्यात आले. ब्लेनहेम शहरातील ‘मॅकडोनल्डस’च्या शाखेने ते बर्गर आणि बर्गरमध्ये आढळून आलेले झुरळ पुढील कारवाईसाठी जमा केरून घेतले. परंतु, सोमवारी सदर बर्गर परत करण्याची मागणी स्टिव्हनसनकडून करण्यात आल्याने पुढील तपासात मर्यादा येत असल्याचे ‘मॅकडोनल्डस’कडून सांगण्यात आले. सरकारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेस्तरॉंची पाहाणी केली असून कोणत्याही प्रकारचे कीटक अथवा झुरळ आढळून न आल्याची माहिती ‘मॅकडोनल्डस’कडून देण्यात आली. ‘एएफपी’ला दिलेल्या माहितीनुसार, ते बर्गर गाडीत बसून ऑर्डर करण्यात आले होते, गाडीतून ते घरापर्यंत नेण्यात आले आणि ग्राहकाने ते घरी खाल्ल्याच्या बाबीवर ‘मॅकडोनल्डस’कडून प्रकाशझोत टाकण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा