अमेरिकेत ई कोलाई या आजारामुळे ४९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मॅकडोनाल्डचा क्वार्टर पाऊंडर हमबर्गर खाल्ल्यानंतर नागरिकांमध्ये या आजाराची लक्षणे दिसत असल्याचं अमेरिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. अमेरिकेत जवळपास १० राज्यांमध्ये आजाराचा प्रादुर्भाव असल्याची माहिती आहे.

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंतचा समावेश

मीडिया रिपोर्टनुसार, सप्टेंबर महिन्याच्या अखेरीसापासून नागरिकांना ई-कोलाई आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. त्यापैकी अनेकांनी मॅकडोनाल्डचा क्वार्टर पाऊंडर हमबर्गर खाल्ल्याचे पुढे आलं आहे. ज्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक २७ प्रकरणं कोलोराडो भागात, तर ९ प्रकरणं नेब्रास्कामध्ये नोंदवण्यात आली आहेत.

implementation of hawkers policy stalled for ten years
विश्लेषण : मुंबईत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी दहा वर्षे का रखडली? मुजोर फेरीवाल्यांना ‘राजकीय आशिर्वाद’?
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
explosion that caused injuries and destroyed vehicles at outside the Karachi airport, Pakistan,
Blast in Pakistan : हल्ला की अपघात? पाकिस्तानच्या कराचीतील स्फोटात चिनी कामगारांचा मृत्यू; चीनच्या निवेदनात रोख कोणावर?
Chennai Air Force Show
Chennai Air Force Show : चेन्नईमध्ये एअर शो पाहण्यासाठी लाखोंची गर्दी; पाच जणांचा मृत्यू, २३० जणांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
Mark-Zuckerberg Top 10 richest people in the world
Mark Zuckerberg : ‘मेटा’चे सीईओ मार्क झुकरबर्ग बनले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती, जेफ बेझोस यांना टाकलं मागे; संपत्ती कितीने वाढली?
Cost of veg thali increased 11 percent in Sept
कांदे, बटाटे, टोमॅटोचे भाव वाढल्याने सप्टेंबरमध्ये शाकाहार महागला!
US central bank Federal Reserve cuts interest rates market
बाजार रंग : बाजाराचा उत्साह टिकेल का?
Shop fire Nashik, hospital safe Nashik, fire Nashik,
नाशिकमध्ये दुकानाला आग, वरच्या मजल्यावरील रुग्णालय सुरक्षित

हेही वाचा – ट्रम्प यांनी McDonald’s मध्ये तयार केले फ्रेंच फ्राइज अन् केली नोकरीची मागणी; कारण काय? याचा कमला हॅरिस यांच्याशी काय संबंध?

क्वार्टर पाऊंडर हमबर्गरच्या विक्रीला तात्पुरती स्थगिती

या घटनेनंतर अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिवेंशन विभागाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. क्वार्टर पाऊंडर हमबर्गरमधील सिल्वर ओनियन आणि बीफमुळे हा आजार होत असावा, असं प्राथमिक निरीक्षण या विभागाकडून नोंदवण्यात आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे याप्रकरणाचा तपास होईपर्यंत प्रभावित राज्यांमध्ये क्वार्टर पाऊंडर हमबर्गरच्या विक्रीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

मॅकडोनाल्लचे सीईओ जो इर्लिंगर यांनीही दिली प्रतिक्रिया

अमेरिकेच्या डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिवेंशन विभागाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर मॅकडोनाल्लचे सीईओ जो इर्लिंगर यांनीही प्रतिक्रिया देत नागरिकांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोतोपरी असल्याचे म्हटलं आहे. तसेच या प्रकरणी आम्ही योग्य ती पावल उचलली असून तपास पूर्ण होईपर्यंत बर्गरमधील सिल्वर ओनियन आणि बीफचा वापर तात्पुरता स्थगित केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा – Blue Zone : ‘ब्लू झोन’ म्हणजे काय? जिथे लोक १०० वर्षे जगतात; जगात ही ठिकाणे कुठे आहेत, तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या!

ई कोलाई आजाराची लक्षणे काय?

संक्रमणानंतर साधारण तीन चार दिवसांनी या आजाराची लक्षणे दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने ताप येणे, उलट्या, घसा कोरडा पडणे, लघवी न येणे, चक्कर येणे या लक्षणांचा समावेश असतो. काही लोकांमध्ये किडनीची समस्याही उद्भवू शकते.