विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट परराष्ट्र खात्याने रद्द केला असल्याचे वृत्त परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी दिले आहे.
विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालयाने सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) विनंतीवरून रद्द केला आहे. पासपोर्ट कायदा १९६७ नुसार मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ट्विटरवरुन दिली.
यापूर्वी देखील मनी लॉंडरिंगप्रकरणी चौकशी सुरू असलेल्या उद्योगपती विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट केंद्र सरकारने चार आठवड्यांसाठी स्थगित केला होता. गेल्या महिन्याभरापासून ब्रिटनमध्ये असलेल्या मल्ल्यांवर विविध बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज थकवल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु आहे.
परराष्ट्र मंत्रालयाकडून विजय मल्ल्याचा पासपोर्ट रद्द
पासपोर्ट कायदा १९६७ नुसार मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
First published on: 24-04-2016 at 12:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mea revokes vijay mallyas passport