कधी ‘अभिनंदन’ या शब्दाचा इंग्रजी अर्थ कॉन्ग्रॅज्युलेशन म्हणजे शुभेच्छा असा होता. पण आता या शब्दाचा अर्थच बदलून गेला आहे. हिंदुस्थान जे काही करतो त्यावर जगाचे बारीक लक्ष असते. शब्दकोशातल्या शब्दांचा अर्थ बदलण्याची ताकत या देशामध्ये आहे असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्लीत गृहनिर्माण मंत्रालयाच्या एका कार्यक्रमात केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानामागे भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्थमान यांच्या सुटकेचा संदर्भ होता. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले वैमानिक अभिनंदन वर्थमान शुक्रवारी रात्री मायभूमीत दाखल झाले. भारत जे काही करतो त्याची जगाकडून दखल घेतली जाते. शब्दकोशातल्या शब्दांचा अर्थ बदलण्याची ताकत भारतामध्ये आहे असे मोदी म्हणाले.

अभिनंदन यांच्या सुटकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विंग कमांडर अभिनंदन यांचे स्वागत करताना तुमच्या शौर्याचा आम्हाला गर्व आहे असं म्हटलं होतं. तुम्ही जे धैर्य आणि शौर्य दाखवलेत त्याचा मलाच माझ्यासह १३० कोटी भारतीयांना अभिमान आहे. आपले लष्कर, वायुदल आणि नौदल याबाबत देशाला गौरव आहे असे टि्वट मोदींनी केले होते.

बुधवारी भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावताना झालेल्या हवाई संघर्षात विग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे मिग-२१ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले व ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. अभिनंदन यांचे विमान कोसळण्याआधी त्यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ-१६ लढाऊ विमान पाडले. भारताने चहूबाजूंनी निर्माण केलेल्या दबावामुळे पाकिस्तानला अभिनंदन वर्थमान यांची सुटका करावी लागली.