पीटीआय, रांची : माध्यमेच न्यायालयांच्या भूमिकेत शिरत असल्यामुळे न्याययंत्रणेच्या कामकाजावर आणि स्वातंत्र्यावर परिणाम होतो. माध्यमांकडून चालवली जाणारी ही ‘कुडमुडी न्यायालये’ लोकशाहीसाठी घातक आहेत, असे भाष्य सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी शनिवारी केले. न्यायमूर्ती सत्य ब्रत सिन्हा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या व्याख्यानमालेतील उद्घाटनपर भाषणात सरन्यायाधीशांनी माध्यमांवरील चर्चाच्या कार्यक्रमांवरही टिप्पणी केली. ते म्हणाले, ‘‘ माध्यमेच एखाद्या प्रकरणाची कुडमुडी सुनावणी घेतात. त्याचबरोबर त्यांनी ठरवलेला त्यांचा ‘अजेंडा’च पुढे रेटणाऱ्या चर्चाही घडवून आणतात. एखाद्या प्रकरणाबाबत निर्णय घेण्यासाठी माध्यमांवरील कुडमुडय़ा सुनावण्या हा मार्गदर्शक घटक होऊ शकत नाही.’’ न्यायमूर्तीनाही निर्णय घेण्यासाठी अवघड वाटणाऱ्या प्रकरणावर माध्यमेच कुडमुडी न्यायालये चालवतात, असे आपण अलीकडे पाहतो. परंतु न्यायदानाशी निगडित चुकीची माहिती आणि अजेंडय़ावर आधारित चर्चा लोकशाहीच्या आरोग्यासाठी मारक ठरत असल्याची खंतही सरन्यायाधीश रमण यांनी व्यक्त केली.
माध्यमांची ‘कुडमुडी न्यायालये’ लोकशाहीला घातक – सरन्यायाधीश
माध्यमेच न्यायालयांच्या भूमिकेत शिरत असल्यामुळे न्याययंत्रणेच्या कामकाजावर आणि स्वातंत्र्यावर परिणाम होतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-07-2022 at 00:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Media courts harmful democracy chief justice judiciary ysh