Meerut building collapse : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये तीन मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून १३ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं असून आणखी काही जणं ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या घटनेची दखल घेतली असून अधिकाऱ्यांना तत्काळ मदतीचे निर्देश देण्यात आले आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री मेरठच्या झाकीर कॉलनी इथं ही दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे तीन मजली इमारत कोसळली आहे. या घटनेत आठ जणांना मृत्यू झाला आहे. इमरातीच्या ढिगाऱ्याखालून १३ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. या पैकी काही जण किरकोळ जखमी आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. महत्त्वाचे म्हणजे आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
Rajasthan Candidate Who Slapped sdm
‘थप्पड’ प्रकरणाने राजस्थानात तणाव; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप; अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांना अटक, समर्थकांकडून जाळपोळ
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

हेही वाचा – Taj Mahal Leakage: मुसळधार पावसामुळे ताजमहालच्या मुख्य घुमटातून गळती सुरू; नुकसानाबाबत पुरातत्व विभागाने दिली माहिती

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला आहे. या पावसामुळे ३०५६ घरांचं मोठं नुकसान झालं असून इमारती कोसळण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या आठवड्यातही पावसामुळे लखनौमधील तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली होती.. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला होता. तर २४ जण जखमी झाले होते.

हेही वाचा – कालिंदी एक्सप्रेसचा अपघात घडवून आणण्याचा कट? कानपूरमध्ये रेल्वे रुळावर सापडला गॅस सिलिंडर, थोडक्यात अनर्थ टळला

या घटनेनंतरही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी तत्काळ दखल घेत अधिकाऱ्यांना तातडीने मदतीच्या सुचना देण्यात आल्या होत्या. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही दु:ख व्यक्त केलं होतं. लखनौमधील इमारत कोसळल्याची घटना दुर्देवी आहे. या घटनेची माहिती मिळताच, अधिकाऱ्यांना मदतीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सद्यस्थिती बचावकार्य सुरू असून आम्ही स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

दरम्यान, उत्तर प्रदेशात मुळधार पावसामुळे आलेल्या पुरात वाहून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. त्याचबरोबर पशूधनाचंही मोठं नुकासान झालं आहे. त्या कुटुंबांनादेखील मदतनिधी देण्यात आली आहे.