Meerut Saurabh Rajput Murder Case : मेरठ येथील मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याची हत्या देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रकरणी सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना अटक करण्यात आली असून त्यांना अंमली पदार्थांचं व्यसन असल्याचं समोर आलं आहे. ते तुरुंगातही अंमली पदार्थांची मागणी करत असून तुरुंगातील जेवन नाकारत आहेत. हिंदूस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका तुरुंग अधिकाऱ्याने त्यांचे सांगितलं की, स्वतःचे किंवा इतरांचे नुकसान होऊ नये म्हणून अतिरिक्त खबरदारी घेण्यात आली आहे. मुस्कानने तिचा प्रियकर साहिलसोबत मिळून ४ मार्च रोजी तिचा पती सौरभची चाकूने वार करून हत्या केली आणि नंतर त्याचे शरीर तुकडे करून ड्रममध्ये लपवले. त्या ड्रममध्ये नंतर त्यांनी सिमेंट भरले. या दृष्कृत्यानंतर प्रेमीयुगालांनी त्यांचं कृत्य झाकण्याकरता हिमाचल प्रदेशला पलायन केले.

मुस्कानची तब्येत बिघडली

हिमाचलमध्ये या प्रेमीयुगुलांनी होळी साजरी केली. केक कापला. बर्फाच्छादित लँडस्केपमध्ये फोटो काढले, असा आरोप केला जात आहे. दरम्यान, हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्यांना अटक केली. अटकेनंतर, मुस्कान आणि साहिल यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. आणि तुरुंगात टाकल्याच्या पहिल्याच रात्री मुस्कानची तब्येत बिघडू लागली. डॉक्टरांनी तिला गंभीर ड्रग्ज व्यसन असल्याचे निदान केले आणि तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले.

दरम्यान, साहिलने गोंधळ घातला आणि त्याला ड्रग्स देण्याची मागणी केली. अंमली पदार्थांचं सेवन केलं नसतानाही तो अत्यंत अस्वस्थ दिसत होता. तर, मुस्कानने मॉर्फिन इंजेक्शनची मागणी केली, असे अधिकृत सूत्रांनी शनिवारी सांगितले. अधिकाऱ्यांनी असंही सांगितलं की हे दोघे इंजेक्शनद्वारे बनवता येणाऱ्या औषधांचे नियमित वापरकर्ते होते, यामुळे आता त्यांना व्यसन सोडणं अवघड झालंय.

आरोपींची काळजी घेणाऱ्या कारागृहातील व्यसनमुक्ती केंद्राने दोघांनाही व्यसनमुक्ती प्रणाली व्यवस्थापित करण्यासाठी उपचारांसाठी ठेवले आहे. कारागृहातील वैद्यकीय पथक देखील त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. सूत्रांनी सांगितले की, मुस्कान आणि साहिल यांच्याकडून अंमली पदार्थांच्या आक्रमक मागणी दरम्यान, दोघांनीही जेवण नाकारले, जे माघार घेण्याचे एक सामान्य लक्षण आहे. त्यांनी सांगितले की दोघांनाही काही प्रमाणात स्थिरता येण्यासाठी किमान दहा दिवस लागतील.

Story img Loader