Muskaan Rastogi Video: उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे मुस्कान रस्तोगी नामक महिलेने तिचा प्रियकर साहिल शुक्लासह कट रचून पती सौरभ राजपूतची हत्या केली. ४ मार्च रोजी हत्या केल्यानंतर दोघेही हिमाचल प्रदेशला थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेले. हत्येच्या अवघ्या ११ दिवसानंतर १४ मार्च रोजी मुस्कान आणि साहिल आनंदात होळी खेळताना दिसून आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात दोघेही रंगाची उधळून करत मौज करताना दिसून येत आहेत. पती सौरभ राजपूतच्या मृतदेहाचे १५ तुकडे केल्यानंतर ते एका ड्रममध्ये टाकून वर काँक्रिट ओतून दोघेही अशा अवस्थेत दिसल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मुस्कान आणि साहिल रंगात माखलेले दिसत आहेत. दोघेही गाण्यावर नाचत असून मौजमजा करत आहेत. काही सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये शेवटी मुस्कान साहिलला किस करतानाही दिसत आहे.

मुस्कान रस्तोगीने ४ मार्चला पती सौरभ राजपूतचा खून केल्यानंतर मुलीला आजी-आजोबांकडे सोडले आणि ती प्रियकर साहिल शुक्लासह हिमाचल प्रदेशला फिरायला गेली. त्यानंतर दोघेही १७ मार्च रोजी मेरठला परतले.

होळीच्या व्हिडीओसह आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुस्कान रस्तोगी एका व्यक्तीला केक भरवताना दिसत आहे. हा व्यक्ती साहिल असल्याचे सांगितले जाते. साहिलच्या वाढदिवसाचे दोघांनी सेलिब्रेशन केल्याचे दिसते. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये मुस्कान बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसत आहे.

अवघ्या काही दिवसांपूर्वी जेव्हा पती सौरभ राजपूत लंडनहून परतला होता. तेव्हा मुस्कान आणि सौरभने मुलीच्या वाढदिवसानिमित्त पार्टी केली होती. त्या पार्टीतही मुस्कान बेभान नाचताना दिसली. त्यानंतर दोनच आठवड्यात सौरभ राजपूतचे अवघे कुटुंब उध्वस्त झाले. मुलीच्या डोक्यावरचे बापाचे छत्र हरवले. तर राजपूत परिवाराने आपला होतकरू मुलगा गमावला. तरीही मुस्कान आणि साहिल यांच्या आयुष्यात काहीही फरक पडला नाही. ते हिमाचल प्रदेशला जाऊन मजा करत राहिले.

प्रकरण कसे उघडकीस आले?

मुस्कान रस्तोगी जेव्हा हिमाचल प्रदेशहून परतली तेव्हा तिने आपल्या आई-वडिलांना सौरभचा खून केल्याचे सांगितले. त्यानंतर तिचे वडील प्रमोद रस्तोगी यांनी तिला थेट पोलीस ठाण्यात नेले आणि तिथे मुस्कानने आपला गुन्हा मान्य केला.

Story img Loader