Chinese Manjha : उत्तर प्रदेशातील मेरटमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली असून, कामावरून परतत असताना चिनी मांजात गळा अडकल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर, या अपघातात त्याच्या दुचाकीवर मागे बसलेल्या मित्राचे नाक कापले गेले आहे. यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव सुहेल (२१) असे तर त्याच्या मित्राचे नाव नवाजीश असे आहे. दरम्यान हे दोन्ही पीडित कामावरून घरी परतत असताना हा अपघात घडला, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान घटनेचे भयंकर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये मृत्यू झालेल्या पीडिताची मान पूर्णपणे कापली गेली आहे.

दरम्यान या प्रकरणी बोलताना पोलिसांनी सांगितले की, “पीडित तरुणांकडेही यावेळी चिनी मांजाचे बंडल सापडले आहे. मात्र, हे पीडित चिनी मांजाच खरेदी करायला गेले होते का, हे स्पष्ट झालेले नाही.”

RSS workers sentenced to life for 2005 murder Case
RSS Workers : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ९ स्वयंसेवकांना जन्मठेप, १९ वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Spanish Tourist girl gored to death While bathing elephant
Elephant Attack : २२ वर्षीय तरुणीच्या थायलंड ट्रीपचा करुण अंत… आंघोळ घालताना हत्ती बिथरला अन्…
Atul Subhash suicide case child custody
Atul Subhash Case: ‘आजी त्याच्यासाठी अनोळखी’, अतुल सुभाष यांच्या आईला नातवाचा ताबा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
six brothers marrying sisters in Pakistan
पाकिस्तानमध्ये सहा भावांचे सहा बहिणींशी लग्न, लहान भावाचे वय १८ वर्ष होण्यासाठी वर्षभर थांबले; या लग्नाची चर्चा का होतेय?
panvel grp constable death
शेवटच्या GPay व्यवहारामुळं उलगडली मर्डर मिस्ट्री; अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकरासह पोलीस पतीला संपवलं
Ajith racing accident
Ajith Kumar : साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा मोठा अपघात, रेसच्या सरावदरम्यान क्रॅश झाली कार; दुर्घटनेचा Video Viral
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…

मेडिकल पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कमालपूर गावातील रहिवासी जान मोहम्मद यांचा मुलगा सुहेल हा त्याचा मित्र नवाजीश याच्यासोबत सोमवारी सायंकाळी दुचाकीवरून काही कामानिमित्त बाहेर गेला होता. लिसाडी परिसरातील गोला कुआन येथू पीडित दुचाकीवरून घरी परतत होते. सुहेल दुचाकी चालवत होता, तर नवाजीश मागे बसला होता. जेव्हा ते पीव्हीएस मॉलकडून तेजगढी चौकाकडे जात होते, तेव्हा दुचाकी चालवत असलेल्या सुहेलची मान चिनी मांज्याने कापली गेली. यामुळे त्याच्या मागे बसलेल्या नवाजीशचेही नाक कापल्याने तो गंभीर जखमी झाला.

हे ही वाचा : EVM Manipulation : “झूठ के गुब्बारों को बुलंदी मिलें…” ईव्हीएमवरील आरोपांना ‘ECI’चे शायरीतून उत्तर; महाराष्ट्राचा दाखला देत फेटाळले आरोप

यानंतर रक्ताने माखलेल्या दोन्ही पीडितांना मेरठ मेडिकल महाविद्यालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी सुहेलला मृत घोषित केले. नवाजीशच्या नाकाला अनेक टाके पडले आहेत. पोलिसांना अपघाताची देताच दोघांचेही कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. सुहेलचे वडील जान मोहम्मद यांनी सांगितले की, “तो मजूर म्हणून काम करायचा. दगड कापण्याची मशीन दुरुस्त करण्यासाठी त्याला मेरठला पाठवण्यात आले होते.”

हे ही वाचा : Women Trainers In Gym : जिम, जलतरण तलावांमध्ये महिला प्रशिक्षक बंधनकारक, प्रशासनाने उचलले मोठे पाऊल

चिनी मांजा म्हणजे काय?

कापण्याची क्षमता वाढवण्यासाठी चिनी मांजाला काचेच्या चुरा किंवा धातूच्या पावडर यांसारख्या तीक्ष्ण घटकांचा लेप दिला जातो. दरम्यान देशात चीनी मांजाची विक्री वापरावर कायद्याने बंदी आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांना पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १ लाख रुपयांपर्यंतच्या दंडाच्या कठोर शिक्षेची तरतूद आहे.

Story img Loader