संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेच्या काळात पंतप्रधान नवाझ शरीफ आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात भेट झाल्यास दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याला तसेच विश्वासार्हता वाढविण्यास हातभारच लागेल, असे तुणतुणे पाकिस्तानने वाजविले आहे.
पुढील महिन्यात दोन्ही देशांचे पंतप्रधान न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेला हजर राहणार आहेत. त्यावेळी ही एक मोठी संधी असल्याचे मत परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते एझाज चौधरी यांनी  व्यक्त केले. आपली भूमी भारतविरोधी दहशतवादी कारवायांसाठी वापर होऊ देण्यास पाकिस्तानने प्रथम अटकाव करावा, असे मनमोहन सिंग यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पाश्र्वभूमीवर केलेल्या भाषणात म्हटले होते. याबाबत विचारल्यावर चौघरी यांनी सांगितले की, जगात कुठेही होणाऱ्या दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तान आपल्या भूमीचा वापर करू न देण्यासाठी बांधील आहे.

Story img Loader