गंगा नदीची स्वच्छता आणि पुनरुज्जीवन करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून केंद्र शासनाने सोमवारी एका राष्ट्रीय बैठकीचे आयोजन केले आह़े या बैठकीला धार्मिके नेते, धोरणकर्ते, स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत़ गंगा स्वच्छतेची दिशा ठरविण्यासाठी या बैठकीत व्यापक चर्चा होण्याची शक्यता आह़े
केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या राष्ट्रीय गंगा खोरे प्राधिकरणाची शाखा असणाऱ्या ‘राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान’च्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात येत आह़े गंगा नदीशी संबंधित गुंतागुंतीच्या समस्या सोडविण्यासाठी विविध मंत्रालये, केंद्र आणि राज्ये, तसेच विविध राज्ये यांच्यात समन्वयाची आवश्यकता आह़े त्यासाठी सर्व संबंधित विभागांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी या ‘गंगा मंथन’ बैठकीचे आयोजन करण्यात आले आह़े या बैठकीत होणाऱ्या विचारमंथनातून गंगेच्या उत्थानासाठी दीर्घ कालावधीसाठी योजना आखणे शक्य होईल, असे अभियानाने काढलेल्या पत्रकात म्हटले आह़े
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा