पीटीआय, मुक्रोह/गुवाहाटी : मेघालयातील ग्रामस्थांच्या एका गटाने आसामच्या पश्चिम कार्बी आंग्लाँग जिल्ह्यातील वन कार्यालयाची मोडतोड आणि जाळपोळ केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी बुधवारी केला. दोन्ही राज्यांच्या सीमेवरील वादग्रस्त भागांत मंगळवारी झालेल्या हिंसाचारात सहा जण ठार झाले. या घटनेचे पडसाद अद्याप उमटत आहेत. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण आहे. आसाम-मेघालय सीमेवर मंगळवारी पहाटे झालेल्या हिंसाचारात एका वनरक्षकासह सहा जणांचा मृत्यू झाला. अवैधरीत्या तोडलेल्या झाडाच्या लाकडांनी भरलेला ट्रक आसामच्या वनरक्षकांनी अडवल्याने हा हिंसाचार सुरू झाल्याचे सांगण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेघालयातील हिंसाचारग्रस्त मुक्रोह गावात एक वाहन पेटवण्यात आले. मेघालयची राजधानी शिलाँगमध्ये आणखी एक वाहन संतप्त जमावाने जाळले. अधिकाऱ्यांनी सांगितले, की मेघालयातील गावांतील रहिवासी चाकू, काठय़ा घेऊन मंगळवारी रात्री आंतरराज्य सीमेवर आसाममधील खेरोनी वन परिक्षेत्रांतर्गत असलेल्या वन कार्यालयासमोर जमले. या जमावाने या कार्यालयात मोडतोड केली व कार्यालयाच्या इमारतीस आग लावली. येथील लाकडी सामान, कागदपत्रे आणि मोटारसायकल पेटवण्यात आली. मात्र, तेथील वन कर्मचाऱ्यांना अद्याप कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

आसाम पोलिसांसह इतर सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच या जमावातील ग्रामस्थ तेथून निघून गेले. मुक्रोह गावात आसाम सरकारचे वाहन स्थानिकांनी जाळले. येथे प्रभाव असलेल्या ‘खासी स्टुडंट्स युनियन’ने मुक्रोह येथे वन कार्यालय व आसामचे सरकारी वाहन जाळण्याची जबाबदारी घेतली. मेघालयातील सत्ताधारी मेघालय ड्रेमॉकॅटिक अलायन्स (एमडीए) सरकार आपल्या नागरिकांना संरक्षण देण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोपही या संघटनेने केला. विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी इयालोंग रुग्णालयात निदर्शने केली. येथे कालच्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आणले आहेत. या वेळी आंदोलकांनी हत्येसाठी जबाबदार असलेल्यांना मेघालय पोलिसांच्या स्वाधीन करण्याची मागणी केली. आसामच्या पोलिसांनी वाहनचालकांना खबरदारीचा उपाय म्हणून मेघालयात न जाण्याचा सल्ला दिला आहे. गुवाहाटी आणि कचार जिल्ह्यांसह आसाममधून मेघालयात जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी अडथळे उभारले आहेत.

आसामचा वाहन नोंदणी क्रमांक असलेली वाहने मेघालयात घेऊन न जाण्याचे आवाहन आसामवासीयांना करण्यात येत आहे. मात्र, व्यावसायिक वाहनांची वाहतूक अद्याप थांबवण्यात आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी गुवाहाटीला परतलेल्या काही टॅक्सी चालकांनी सांगितले, की मेघालय पोलिसांनी त्यांना संरक्षण देऊन आसाम सीमेपर्यंत नेले, परंतु तरीही त्यांच्या वाहनांवर दगडफेक झाली. मेघालय सरकारने सात जिल्ह्यांत मोबाइल इंटरनेट सेवा थांबवली आहे. आसाम पोलिसांनी सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आसाम सरकारने दिले आहेत. 

आरोप- प्रत्यारोप

भाजपशी सख्य असलेले मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांना ‘टॅग’ करत केलेल्या ‘ट्विट’मध्ये आसाम पोलीस आणि वनरक्षकांनी मेघालयात प्रवेश करून बेछुट गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. या वेळी मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांपैकी पाच जण मेघालयचे रहिवासी होते व एक आसामचा वनरक्षक असल्याचे संगमा यांनी सांगितले. मात्र आसामच्या पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले, की आसाममध्ये पश्चिम कार्बी आंगलाँग जिल्ह्यात वनविभागाच्या पथकाने एका ट्रकला रोखले होते. नंतर मेघालयातील ग्रामस्थांच्या जमावाने आसामचे वनरक्षक व पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आसाम पोलिसांना गोळीबार करावा लागला.

मेघालय-आसामतर्फे प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर

मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी मृताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची, तसेच आसाम सरकारनेही प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. मेघालयातील मंत्र्यांचे एक पथक २४ नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन या प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशीची मागणी करणार आहे. आसाम सरकारने या प्रकरणाची चौकशी केंद्रीय किंवा त्रयस्थ संस्थेकडे सोपवणार असल्याचे सांगितले. आसामच्या हिमंता बिस्वा सरमा सरकारने संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षकांची, एसपीची बदली केली आहे. तसेच संबंधित जिरीकिंडिंग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व खेरोनी वनविभागाचे वन संरक्षक अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.