Satyapal Malik On agnipath scheme : अग्निपथ योजनेवरून मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारवर पुन्हा टीकास्र सोडले आहे. अग्निपथ योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी अशी मागणी मलिक यांनी केली आहे. तसेच त्यांनी मोदी सरकारला इशाराही दिला आहे.
ते म्हणाले, ”अग्निपथ योजना मोदी सरकारने मागे घ्यावी, ही योजना चांगली नाही. असंतुष्ट मुले सैन्यात गेली, तर त्यांच्या हातात रायफल असेल. त्याची दिशा काय असेल माहिती नाही, ती रायफल कुठे चालेल सांगणात येत नाही”, असा इशारा मलिक यांनी मोदी सरकारला दिला आहे. तसेच केंद्र सरकार घंमडी असल्याचेही ते म्हणाले.
शेतकरी आंदोलनाच्या काळापासून सत्यपाल मलिक मोदी सरकारवर टीका करत आहेत. मी कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही आणि माझा राजीनामा माझ्या खिशात आहे आणि पंतप्रधान मोदींनी इशारा करावा, मी राजीनामा देईल, असेही मलिक म्हणाले.
हेही वाचा – प्राण गेले तरी बेहत्तर.., पण अमरावती ही भाजपाची प्रयोगशाळा होऊ देणार नाही – यशोमती ठाकूर