ब्रिटन संसदेसमोरील चौकात महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्यास आवश्यक असलेले एक दशलक्ष पौंड गोळा करण्याकरिता जनजागृतीसाठी भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ, लॉर्ड मेघनाद देसाई हे सत्याग्रह करणार आहेत. या काळात ते उपोषण करणार आहेत. महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्यासाठी आवश्यक असलेला निधी गोळा करण्यासाठी ७४ वर्षीय देसाई यांनी महात्मा गांधी स्मृती विश्वस्त संस्था स्थापन केली आहे. गांधीजींचा पुतळा उभारण्यासाठी शासकीय परवानगी जाहीर झाल्यानंतर लगेचच देसाई यांनी उपोषणाची घोषणा केली. गांधीजींनी अनेकदा चांगल्या कारणांसाठी उपोषण केले आणि काही चांगल्या कारणांसाठीच मीही उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे देसाई म्हणाले.
ईश्वरनिंदेवरून हत्या
लाहोर: ईश्वरनिंदा करणाऱ्या एका ख्रिस्ती दाम्पत्याची बुधवारी पाकिस्तानात जमावाने जाळून हत्या केली होती. या घटनेला एका दिवस पूर्ण होत नाही तोच पंजाब प्रांतातील एका पोलिसाने ईश्वरनिंदा करणाऱ्या शिया नागरिकाची हत्या केली. गुजरात शहरात राहणाऱ्या या शिया नागरिकाने ईश्वराबाबत गैरशब्दांचा वापर केला. त्यामुळे त्याला मी ठार मारले, असे सय्यद तुफेल शाह या पोलिसाने सांगितले. गुजरात पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई केली आहे.
दिल्लीत प्रदूषणाचा कळस
नवी दिल्ली: राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील हवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असून शेजारील राज्यातील शेतीतील टाकाऊ माल वेळोवेळी जाळला जात असल्याने शहरावर धुरांचे लोट कायम असतात. त्यातून प्रदूषणात वाढ होत असल्याचे तज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिले आहे.
शासकीय आकडेवारीनुसार, दिल्ली शहरातील हवेच्या शुद्धतेचा दर्जा अत्यंत निकृष्ट गटापर्यंत घसरला आहे.

Story img Loader