भाजपाकडून राष्ट्रध्वजाचा वापर केवळ राजकारणासाठी होत असल्याचा आरोप जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपात हिंमत असेल तर त्यांनी चीनच्या ताब्यातील लडाखमध्ये राष्ट्र्ध्वज फडकवून दाखवावा, असे आव्हानही त्यांनी भाजपाला दिले. गुरुवारी श्रीनगरमध्ये पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपकडून राष्ट्रध्वजाचा वापर केवळ राजकारणासाठी करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या नावाखाली नागरिकांना घरावर राष्ट्रध्वज लावण्यासाठी धमकी दिली जात आहे. हेच नवीन काश्मीर आहे का? असा प्रश्न मेहबुबा मुफ्ती यांनी उपस्थित केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपामध्ये हिंमत असेल तर चीनने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या जमिनीवर तिरंगा फडकवून दाखवा, असे आव्हानही त्यांनी भाजपाला दिले.

हेही वाचा – “त्यांच्यावर बोलणे म्हणजे आपल्याच तोंडाची वाफ गमावणे” राऊतांच्या सत्तांतराच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांची टीका

”भाजपामुळे काश्मीरमधील शांतता भंग झाली आहे. मला पंतप्रधान मोदी यांना एवढंच सांगायचे आहे की, जर तुम्हाला भारताला विश्वगुरू बनवायचे असेल तर तुम्हाला आधी जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करावी लागले. भारताचा विश्वगुरु होण्याचा मार्ग काश्मीरमधून जातो”, असेही त्या म्हणाल्या.

जोपर्यंत भारत-पाक संबंध सुधारत नाही. तोपर्यंत काश्मीरचे नुकसान होतच राहील. काश्मीरवर आक्रमण करणाऱ्या जुन्या आक्रमकांनी येथे मशिदी बांधण्यासाठी मंदिरे उद्ध्वस्त केली आणि तुम्ही मंदिरे बांधण्यासाठी मशिदी नष्ट करत आहात. त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे?”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mehbooba mufti alligation on pm modi and bjp on national flag spb