जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्याचा निढा कायम असतानाच पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती सोमवारी दिल्लीत आल्या असून त्या मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपसमवेत आघाडीचे पुनरुज्जीवन करण्याचा मार्ग थांबला असल्याने मुफ्ती यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने मेहबूबा पाच दिवसांच्या कालावधीत दुसऱ्यांदा राजधानीत दाखल झाल्या आहेत.

Story img Loader