श्रीनगर : ‘नॅशनल कॉन्फरन्स’च्या जागा कमी करण्यासाठी अपक्ष उमेदवारांची फौज भाजपने निवडणुकीत उतरवली असल्याचा गंभीर आरोप पक्षाचे सर्वेसर्वा ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे. भाजपवरील हा आरोप खरा ठरला तर जम्मू-काश्मीरच्या सरकार स्थापनेमध्ये मेहबुबा मुफ्ती यांची पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) किंगमेकर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काश्मीर खोऱ्यामध्ये लोक पुन्हा ‘नॅशनल कॉन्फरन्स’कडे आशेने पाहू लागले आहेत. पण, या प्रमुख प्रादेशिक पक्षाला अडचणीत आणण्यासाठी खोऱ्यात अस्तित्व नसलेले राष्ट्रीय लोकजनशक्ती वगैरे अनेक छोटे पक्ष तसेच अपक्ष उभे राहू लागले आहेत. या पक्षांचा आणि उमेदवारांचा मुख्य उद्देश ‘नॅशनल कॉन्फरन्स’ला (एनसी) पराभूत करणे हाच असल्याचा दावा अब्दुल्ला यांनी केला आहे. या अडथळ्यांच्या शर्यतीत ‘एनसी’-काँग्रेसला बहुमत मिळाले नाही तर, सरकार स्थापनेमध्ये पर्यायी आघाडीला महत्त्व प्राप्त होईल. अशावेळी ‘पीडीपी’शिवाय सरकार बनवणे ना भाजपला शक्य होईल ना ‘एनसी’-काँग्रेस आघाडीला! त्यामुळेच सरकार स्थापनेच्या नाड्या हाती येण्याची ‘पीडीपी’ आतुरतेने वाट पाहात असल्याचे मानले जात आहे.

Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Manisha kayande
मुख्यमंत्री शिंदेच पुन्हा ‘किंग’?… शिवसेना प्रवक्त्यांनी जे सांगितले त्यावरून…
panvel maha vikas aghadi
पनवेल: महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी येणारे नेते गोंधळात
bjps emphasis on symbol of party rather than candidates in belapur constituency
संदीप नाईकांच्या बंडखोरीमुळे भाजपचा बेलापूरमध्ये उमेदवारापेक्षा चिन्हावर भर
Who will be Chief minister if Mahayuti wins
महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाकडून मिळालेले ‘हे’ संकेत महत्त्वाचे
anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका
HM Shri Amit Shah addresses public meeting in Shirala
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी डझनभर इच्छुक; अमित शहा

हेही वाचा >>> Sushilkumar Shinde : “मी तेव्हा जम्मू-काश्मीरला जायला घाबरलो होतो”, सुशीलकुमार शिंदेंचं विधान चर्चेत

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग हा ‘पीडीपी’चा बालेकिल्ला असून इथल्या बिजबेहरा मतदारसंघातून मेहबुबा मुफ्ती यांच्याऐवजी त्यांची मुलगी इल्तिजा पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची वारसदार म्हणून इल्तिजाकडे पाहिले जात आहे. इल्तिजा निवडून येऊ शकतील हे खरे असले तरी ‘पीडीपी’ला ८-१० जागांवरच समाधान मानावे लागेल असे दिसते. ‘आमचा पक्ष छोटा असून आम्हाला जागाही तेवढ्याच मिळतील. आम्ही सत्तेचे दावेदार नाही’, अशी कबुली मुफ्ती यांचे विश्वासू व ‘पीडीपी’चे प्रवक्ता नजमू साकीब यांनी दिली.

हेही वाचा >>> Congress on Madhabi Puri Buch : “माधबी पुरी बूच यांनी कोट्यवधींची…”, काँग्रेसच्या नव्या आरोपाने खळबळ

२०१४ मध्ये भाजपविरोधात प्रचार करून ‘पीडीपी’ने २८ जागा जिंकल्या होत्या. पण, निकालानंतर भाजपशीच हातमिळवणी करून ‘पीडीपी’ने जम्मू-काश्मीरमध्ये सत्तास्थापन केली होती. त्यानंतर चार वर्षांत मतभेदामुळे २०१८मध्ये पीडीपी-भाजपचे सरकार कोसळले. सत्तेसाठी भाजपसोबत गेल्याचा ‘पीडीपी’वरील राग लोकांच्या मनातून अजूनही गेलेला नाही. शिवाय, ‘पीडीपी’मध्ये उभी फूट पडून अल्ताफ बुखारी यांनी ‘अपनी पार्टी’ स्थापन केली. त्यामुळे ‘पीडीपी’ कमकुवत झाली आहे. या फुटीमागेही भाजपचा हात असल्याची चर्चा होत होती. भाजपशी युती केल्याचा मोठा फटका यावेळी ‘पीडीपी’ला बसण्याची शक्यता असल्याने ‘पीडीपी’ कसेबसे जागांचे दशक गाठेल असे सांगितले जाते. पण, ‘नॅशनल कॉन्फरन्स’ला अडवण्याच्या खेळात भाजपने ‘पीडीपी’चे महत्त्व वाढवले असल्याचे मानले जात आहे. म्हणूनच ‘आम्ही तर कुंपणावर बसून गंमत पाहतोय’, अशी मार्मिक प्रतिक्रिया साकिब यांनी दिली. ‘एनसी’-काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाले नाही तर सरकार स्थापनेसाठी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ओमर अब्दुल्ला-राहुल गांधी यांना ‘इंडिया’ आघाडीचा घटक पक्ष म्हणून मेहबुबा मुफ्तींकडे ‘पीडीपी’च्या पाठिंब्याची विनंती करावी लागेल. दुसऱ्या बाजूला भाजपने छोटे पक्ष व अपक्षांना सोबत घेऊन सत्तास्थापनेचा निर्णय घेतला तरी या निकालोत्तर युतीला ‘पीडीपी’च्या पाठिंब्याची गरज लागेल. म्हणूनच जम्मू-काश्मीरमध्ये बहुमताविना सत्तास्थापनेत ‘पीडीपी’ला किंगमेकर होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. (क्रमश:)