Mehbooba Mufti Jammu Kashmir News : जम्मू काश्मीरच्या डोडा भागात भारतीय लष्कर व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाले आहेत. या घटनेवरून जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी जवान काश्मीरमध्ये येतात, मात्र इथून परत जातं ते त्यांचं पार्थिव…तेही शवपेटीतून… मोदी सरकार म्हणतंय की काश्मीर खोऱ्यातला दहशतवाद संपलाय, मग काश्मीरमध्ये आपल्या जवानांना कोण मारतंय? या सर्व घटनांना कोण जबाबदार आहे? जम्मूत सध्या जे काही घडतंय त्याची जबाबदारी हे सरकार घेणार आहे का?”

मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, “जम्मूत सध्या काय घडतंय? तिथलं वातावरण कोणामुळे बिघडलंय? तिथे मोठ्या प्रमाणात हत्या होत आहेत, आपले जवान मारले जात आहेत. गृहमंत्र्यांनी (अमित शाह) या घटनांची जबाबदारी घ्यावी. गेल्या अनेक महिन्यांपासून हे सगळं घडतंय, मात्र गृह मंत्रालयाने याबाबत चकार शब्द उच्चारलेला नाही. गेल्या ३२ महिन्यांमध्ये जम्मू-काश्मीर अशांत आहे. प्रामुख्याने नव्या पोलीस महासंचालकांची नियुक्ती झाल्यापासून इथलं वातावरण दूषित झालं आहे.”

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Iltija Mufti news
Iltija Mufti : “हिंदुत्व हा एक आजार, कारण..”; रतलामचा व्हिडीओ पोस्ट करत इल्तिजा मुफ्ती यांचं वादग्रस्त वक्तव्य
padsaad reders reactions
पडसाद: अबू यांची चित्रशैली उलगडली

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री म्हणाल्या, “सीमेवर आपले काश्मिरी बांधव नाहीत, मुसलमानही नाहीत, पत्रकार व व्यापारी देखील नाहीत. तुम्हीच (केंद्र सरकार व भारतीय लष्कर) देशाच्या सीमा सुरक्षित करता. मग देशात होणारी घुसखोरी रोखण्याची जबाबदारी कोणाची आहे? ही स्थानिक सुरक्षा बलाची जबाबदारी नाही. तुम्ही तुम्हाला वाट्टेल तसा अपप्रचार करत आहात, गेल्या सहा वर्षांपासून तुम्ही काश्मीरमध्ये अपप्रचार केलात, त्यातून काय साध्य केलंत? आता तुम्हाला उत्तर काश्मीरमध्ये मोठा धक्का बसला आहे.”

security forces on high alert in jammu and kashmir due to hidden terrorism
(संग्रहित छायाचित्र)

हे ही वाचा >> “देवीनं स्वप्नात येऊन मला आदेश दिले”, म्हणत स्वयंघोषित बाबानं उत्तराखंडमध्ये १६५०० फुटांवर बांधलं मंदिर; पवित्र कुंडाचा स्वीमिंग पूल…

पोलीस महासंचालकांना बडतर्फ करण्याची मागणी

पीडीपी प्रमुख म्हणल्या, “काश्मीरवर होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांची सरकारने जबाबदारी घेतलेली नाही. त्यांनी योग्य वेळी येथील पोलीस महासंचालकांना बडतर्फ करायल हवं होतं. गेल्या ३२ महिन्यांत काश्मीर खोऱ्यात आपण आपले ५० हून अधिक जवान गमावले आहेत. परंतु, हे सरकार त्या जवानांची देखील जबाबदारी घेत नाही. सध्याचे पोलीस महासंचालक केवळ राजकीयदृष्ट्या निर्णय घेत आहेत. ते पीडीपी पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ते स्थानिक नागरिकांना, पत्रकारांना त्रास देत आहेत, धमक्या देत आहेत. तसेत ते मौलवींना ब्लॅकमेल करत आहेत.”

Story img Loader