अँटिगाच्या अधिकाऱ्यांचा दावा

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याला २०१७ मध्ये अँटिगाचे नागरिकत्व देण्यापूर्वी त्याच्याबाबतची माहिती जाणून घेण्यात आली त्यावेळी भारतीय यंत्रणांनी चोक्सी याच्याविरुद्ध कोणतीही प्रतिकूल माहिती नसल्याचे सांगितले, असा दावा अँटिगाने केल्याबाबतचे वृत्त त्या देशातील स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

गुंतवणुकीशी संबंधित नागरिकत्व अँटिगातील अधिकाऱ्यांनी दिले मात्र मोदी प्रकरणात क्लीन चिट देताना अँटिगातील अधिकाऱ्यांनी भारतीय यंत्रणांपैकी सेबीचा हवाला दिला. मे २०१७ मध्ये चोक्सी याचा नागरिकत्वाचा अर्ज आला त्यासोबत निकषांनुसार आवश्यक असलेला स्थानिक पोलिसांचा मंजुरी अहवालही होता, असे ‘द डेली ऑब्झव्‍‌र्हर’ या अँटिगातील वृत्तपत्राने म्हटले आहे.

‘सेबी’कडून इन्कार

सेबीने मात्र अ‍ॅण्टिगाच्या दाव्याचा इन्कार केला आहे. अशा प्रकारची कोणतीही विनंती आम्हाला करण्यात आली नाही किंवा आम्ही अँटिगातील संबंधित विभागाला कोणतीही माहिती दिलेली नाही, असे सेबीने स्पष्ट केले.